Menstrual Leave Saam Tv
देश विदेश

Menstrual Leave : मासिक पाळीत नोकरदार महिलांना मिळणार सुट्टी; स्वातंत्र्यदिनी 'या' राज्याने घेतला महत्वाचा निर्णय

Odisha government announces leave on period day : महिलांना आता मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सुट्टी मिळणार आहे. ओडिशा सरकारने काल हा मोठा निर्णय घेतलाय.

Rohini Gudaghe

मुंबई : महिलांसाठी एक खुशखबर आहे. आता सरकारी आणि खासगी क्षेत्रामधील महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एका दिवसाची रजा मिळणार आहे. ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ही मोठी घोषणा केलीय. कटक येथे जिल्हास्तरीय स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात ओडिशाच्या उपमुख्यमंत्र्‍यांनी हा निर्णय जाहीर केलाय.

पीरीयड्समध्ये मिळणार महिलांना सुट्टी

ओडिशाचे उपमुख्यमंत्री प्रवती परिदा कटक येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त बोलताना म्हणाल्या की, आजपर्यंत महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी मिळत नाही. त्यामुळे सरकारने या काळात महिलांना एका दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय (Odisha government) घेतलाय. या अंतर्गत महिला त्यांच्या पीरियड्सच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. त्यांच्यासाठी ही रजा ऐच्छिक असणार आहे, म्हणजेच त्यांना हवी असेल तरच रजा मिळेल.

ओडिशा राज्याचा महत्वाचा निर्णय

हा निर्णय (Menstrual Leave) सरकारी कर्मचाऱ्यांसोबत खासगी कंपन्यांना देखील लागू होणार असल्याचं परिदा यांनी सांगितलंय. जपान, तैवान, चीन आणि कोरियासारख्या देशांनी पीरियड्सबाबत विशेष धोरणं बनवलेली आहेत. आणि आता भारतात देखील याची मागणी होत आहे. त्यामुळे ओडिशा सरकारने या दृष्टीने पाऊल उचललंय. ओडिशा सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील कौतुक केल्याची माहिती (independence day 2024) मिळतेय.

महिला कर्मचाऱ्यांना महिन्यातून एका दिवसाची रजा

उपमुख्यमंत्री प्रवती परिदा म्हणाल्या की, या उपक्रमामागील उद्देश महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा (leave on period day) आहे. रजा घेण्याचा निर्णय ऐच्छिक आहे. ज्या महिला व्यावसायिक कामात गुंतल्या असतील त्या मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतात. एका संशोधनानुसार ४० टक्के मुली पीरियड्समुळे शाळेत जाणं टाळतात. शाळेतील गोपनीयतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव अन् जागरूकता यासारख्या बाबी यास कारणीभूत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ट्रम्पनं खर्ग बेटाचा केला नरक; इराणच्या सर्वात मोठ्या तेल साठ्यावर हल्ला

IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

कोरियाचा किम जोंगही युद्धाच्या मैदानात? किम जोंगचा 10 मिसाईल्सचा मारा, जगात तिसरं महायुद्ध भडकणार?

LPGला स्वदेशी DMEचा पर्याय, गॅसच्या आत्मनिर्भरतेसाठी NCLचा प्रयोग

Maharashtra Live News Update : खामगाव तालुक्यातील रामनगर गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन गटात तणाव

SCROLL FOR NEXT