Arvind Kejriwal  Yandex
देश विदेश

Arvind Kejriwal : तिहार जेलमध्ये CM अरविंद केजरीवाल यांच्यासाठी मेडिकल बोर्डाची स्थापना; AIIMS चे ५ डॉक्टर करणार तपासणी

Arvind Kejriwal Latest News : दिल्लीच्या तिहार तुरुंगात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याची तपासणीसाठी AIIMS च्या ५ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाची तपासणी करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दिल्लीच्या तिहार तुरुंगात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आरोग्याची तपासणीसाठी AIIMS च्या ५ डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाची तपासणी करण्यात आली आहे. याबाबत २३ एप्रिलला कोर्टाचा आदेश आला. यानंतर या मेडिकल बोर्डाची स्थापना करण्यात आली असून त्याचे नेतृत्व डॉ. निखिल टंडन यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे.

अरविंद केजरीवाल यांना सोमवारी २२ एप्रिलला दुपारी सकाळी जेवणाच्या आधी २ युनिट इन्सुलिनचे डोज देण्यात आले. त्यानंतर रात्री जेवणाच्या आधी २ युनिट इन्सुलिनचे डोज देण्यात आले. अरविंद केजरीवाल यांची मेडिकल बोर्डासोबत बैठक झालेली नाही. मेडिकल बोर्ड आज अरविंद केजरीवाल यांची तपासणी करण्याची शक्यता आहे.

तिहार जेलचे डॉक्टर अरविंद केजरीवाल यांची साखरेची पातळी तपासतात. तसेच त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवतात. कोर्टाच्या आदेशानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना घरातील जेवण देण्यात येत आहे. सध्या केजरीवाल यांची प्रकृती स्थिर आहे.

संजय सिंह यांचे गंभीर आरोप

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी गुरुवारी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपाल वीके सक्सेना यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात तिहार तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्यासाठी टॉर्चर रुम तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे.

संजय सिंह यांनी पुढे म्हटलं की, 'पंतप्रधान कार्यालय त्यांच्यावर २४ तास लक्ष देत आहे. केजरीवाल यांना २३ दिवसापर्यंत इन्सुलिन देण्यात आली नव्हती. दिल्लीच्या सेवा करणे गुन्हा आहे का, त्यांच्यासोबत व्यक्तिगतरित्या शत्रुत्व आहे का, तुम्हाला विरोधी पक्षाच्या नेत्याचा जीव घ्यायचा आहे का? मला दु:ख वाटत आहे की, हे सर्व पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली होत असल्याचा आरोप संजय सिंह यांनी यावेळी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एकता नगरी एका सोसायटीत पाणी घुसले

IND vs ENG: टीम इंडिया 76 रन्सवर गारद! इंग्लंडविरूद्धच्या लाजीरवाण्या पराभवासाठी हे 5 खेळाडू जबाबदार

Rain Alert: राज्यात आजही अतिवृष्टी, वादळी-वाऱ्यासह पावसाचा अंदाज; पुढचे २४ तास महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, नेरळ- भिवपुरीदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी, बदलापूर ते कर्जत वाहतूक ठप्प

Wednesday Horoscope: कौतुक होणार; ५ राशींच्या व्यक्तींच्या पैशांच्या समस्या सुटणार, वाचा आजचे खास राशीभविष्य

SCROLL FOR NEXT