Doctor  saam tv
देश विदेश

Doctor Applies Feviquick On Wounds: तेलंगणामध्ये MBBS डॉक्टरचा अजब प्रताप, 7 वर्षांच्या मुलाच्या जखमेवर लावले फेविक्विक

Karnataka News: एमबीबीएस डॉक्टरचा (MBBS Doctor) हा अजब प्रताप पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

Priya More

Telangana News: तेलंगणामधून (Telangana) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका डॉक्टरने सात वर्षांच्या मुलाच्या जखमेवर चक्क फेविक्विक लावले. ही घटना तेलंगणाच्या जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यात घडली आहे. एमबीबीएस डॉक्टरचा (MBBS Doctor) हा अजब प्रताप पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडवाल जिल्ह्यातील ईजा नगरपालिकेच्या रेनबो रुग्णालयात ही घटना घडली आहे. एका एमबीबीएस डॉक्टरने सात वर्षांच्या मुलाच्या जखमेवर फेविक्विक लावले. या घटनेप्रकरणी संतप्त झालेल्या पीडित मुलाच्या पालकांनी डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. या डॉक्टरविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पीडित मुलाचे वडील वामसी कृष्णा यांनी सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी सुनीता आणि सात वर्षांचा मुलगा प्रविण कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर येथे राहतात. ते शुक्रवारी कुटुंबीयांसोबत एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आयजा येथे गेले होते. लग्नसमारंभात त्यांचा मुलगा प्रविण इतर मुलांसोबत खेळत होता. त्याचवेळी तो चुकून पडला आणि त्याच्या डाव्या डोळ्याला जखम झाली.

वामसी कृष्णा यांनी जखमी प्रविणला उपचारासाठी तात्काळ ईजा नगरपालिकेच्या रेनबो रुग्णालयामध्ये घेऊन गेले. या रुग्णालयात एमबीबीएस डॉक्टर नागार्जुन यांनी त्यांच्या मुलावर उपचार करण्यास सुरुवात केली. या डॉक्टरने त्यांच्या मुलाच्या जखमेवर फेविक्विक लावून उपचार केले. ज्यामुळे त्यांच्या मुलाला आणखी वेदना होऊ लागल्या आणि तो रडू लागला. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेले. त्यावेळी दुसऱ्या डॉक्टरांनी त्यांना आधीच्या डॉक्टरांनी त्यांच्या मुलाच्या दुखापतीवर फेविक्विक लावले होते असे सांगितले.

या घटनेनंतर वामीस कृष्णा यांनी शुक्रवारी आयझा पोलिस ठाण्यात रेनबो हॉस्पिटलमध्ये उपचार करणाऱ्या या डॉक्टराविरोधात तक्रार दाखल केली. तसंच त्यांनी डॉक्टरविरोधात कारवाईची मागणी केली. ही घटना उघडकीस येताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या एमबीबीएस डॉक्टरच्या निष्काळजीपणावर आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी नेटिझन्सने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT