सोन्याच्या दराने एक लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी ओडीशामध्ये शास्त्रज्ञांना सोन्याची खाण सापडली होती. त्यानंतर आता भारताच्या हृदयात सोन्याची खाण सापडली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात सोन्याचा मोठा साठा सापडलाय. जबलपूर लोह, मॅंगनीज, बॉक्साईट यासारख्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील सिहोरा तहसीलमधील बेला ग्रामपंचायत हद्दीत सोन्याची खाण सापडली आहे. अनेक वर्षांचा अभ्यास आणि सर्वेक्षणानंतर भूगर्भशास्त्रज्ञांनी या भागात जमिनीखाली मोठ्या प्रमाणात सोन्यासारखे मौल्यवान धातू असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था आणि इतर भूगर्भीय तज्ञांच्या पथकाने एक संशोधन अहवाल तयार केला आहे.
बेला आणि बिनाका गावामधील जमीन खोदून नमुने घेण्यात आले. ज्यामध्ये सोन्याचे कण आढळून आले. सरकारी विभागांनी तेथे एक खड्डा खणला आणि संबंधित तपशीलांची नोंद केली. हा सोन्याचा साठा 100 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेला आहे. त्यात अनेक टन सोने असण्याची अपेक्षा आहे. सिहोरा परिसराची भूगर्भीय रचना आधीच खाणकामासाठी योग्य मानली गेली आहे.
सोन्याचे उत्पादन या भागात सुरू झाले तर मध्य प्रदेशच्या आर्थिक प्रगतीत एक मैलाचा दगड ठरू शकते. दरम्यान बेला गाव आणि आसपासच्या परिसरातील लोक मोठ्या संख्येने सोने सापडलेले ठिकाण पाहण्यासाठी येत आहेत. या खाणीमुळे रोजगार आणि विकासाचे नवे दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे. एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं. जबलपूरमधल्या सोन्याच्या खाणीने तेच अधोरेखीत केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.