Alipur Paint Factory Fire Saam TV
देश विदेश

Delhi Fire News: दिल्लीतील पेंट फॅक्टरीला भीषण आग; ११ कामगारांचा होरपळले, थरकाप उडवणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

Alipur Paint Factory Fire: दिल्लीतील पेंट फॅक्टरीला गुरुवारी भीषण आग लागली. या दुर्घटनेत ७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

Satish Daud

Delhi Alipur Paint Factory Fire

दिल्लीतील अलीपूर येथील एका पेंट फॅक्टरीला गुरुवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला आणि बघता-बघता संपूर्ण फॅक्टरी आगीच्या भक्षस्थानी आली. या दुर्घटनेत ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल २२ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आली. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. आगीत जखमी झालेल्या कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Crime News)

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरी आहे. गुरुवारी या फॅक्टरीत कामगार काम करीत होते. तेव्हा अचानक भीषण आग लागली. ही आग अत्यंत भयंकर होती, की मोठमोठे धुराचे लोळ उठले. यामुळे कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

आगीच्या विळख्यात सापडल्याने ११ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात, कारखान्याला लागलेली भीषण आग आणि आकाशात उंच-उंच जात असलेले धुराचे लोट दिसत आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू होते. फॅक्टरीत झालेल्या स्फोटामुळे ही आग लागली असावी, अशी प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT