JAIPUR FIRECRACKER WAREHOUSE FIRE KILLS SEVEN IN DEADLY EXPLOSION saam tv
देश विदेश

Jaipur Fire: फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; ७ जणांचा होरपळून मृत्यू

Firecracker Warehouse Fire : जयपूर शहरातील खोह-नागोरियन परिसरातील फटक्याच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली.

Bharat Jadhav

  • फटाक्यांच्या गोदामाला लागलेल्या आगीत होरपळून ७ जणांचा मृत्यू

  • प्राथमिक माहितीनुसार गोदामात स्फोट झाल्यानंतर भीषण आग लागली.

  • आयेशा नगर तलाई कॉलनीतील एका लहान घरात फटाके साठवले होते.

राजस्थानमधील जयपूर येथील खोह- नागोरियन परिसरात असलेल्या एका फटाक्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. एसएमएस मेडिकल कॉलेजचे मुख्याध्यापक आणि रुग्णालयाचे अधिकारी डॉ. दीपक माहेश्वरी यांनी फटाक्याच्या फॅक्ट्रीला आग लागल्याची माहिती दिली.

मिळालेल्या वृत्तानुसार, मंगळवारी सकाळी जयपूरच्या खोह नागोरियन भागातील एका कथित बेकायदेशीर फटाक्यांच्या गोदामात स्फोट झाला त्यानंतर भीषण आग लागली. खोह नागोरियनच्या आयेशा नगर तलाई कॉलनीतील एका लहान घरात ही आग लागली, जिथे कथितरित्या फटाके साठवून ठेवले होते.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेबदद्ल दुःख व्यक्त केले. इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणाले, "जयपूरच्या खोह नागोरियन परिसरात झालेल्या अपघातातील जीवितहानीची बातमी दुःखद आणि दुर्दैवी आहे." जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्य आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या आत्माला शांती मिळो, तसेच दु: खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांप्रती सांत्वन करतो,देव त्यांना दु:खातून सावरण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करतो.

आग का लागली याची चौकशी केली जाणार

जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, परिसरात ठेवलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आग लागली असावी. "घरात काही ज्वलनशील पदार्थ होते, परंतु आगीचे नेमके कारण काय आहे हे सविस्तर तपासानंतरच कळेल."

ते घर निवासी भागात होते त्याचा बेकायदेशीरपणे गोदाम म्हणून वापर केला जात होता. त्या गोदामाजवळच एक उत्पादन युनिट होते. "प्राथमिक दृष्ट्या, ही एक साठवणुकीची जागा असल्याचे दिसते. फॉरेन्सिक चाचणीतून गोदामात साठवलेला माल फटाके होता की नाही, हे निश्चित होईल." मालक आणि जबाबदार असलेल्या कोणावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती जयपूरचे पोलीस आयुक्त सचिन मित्तल यांनी दिली आहे. "

प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबीती

एका स्थानिक व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधी एका स्फोटाचा आवाज ऐकला. स्फोटाचा आवाज आल्यानंतर त्यांनी गोदामाकडे धाव घेतली. स्थानिकांनी गोदामातील कामगारांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आग लागल्यानंतर पाण्याचा टँकरला पाचारण करण्यात आले. त्यांनी एका पाईपच्या साहाय्याने आगीवर पाणी टाकलं. नंतर आत जाण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी तीन-चार लोकांना बाहेर काढलं. नंतर रुग्णालयात नेण्यात आले. गोदामाच्या शेजारी राहणाऱ्या लियाकत नावाच्या दुसऱ्या रहिवाशाने सांगितले की, संपूर्ण गोदामाला आगीच्या भक्ष्यस्थानी टाकण्यापूर्वी त्याला सिलेंडरच्या स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: रोज रात्री झोपण्याआधी जिरा पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

ITR Filing: वेळेआधी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याचे ३ मोठे फायदे, शेवटची तारीख कधी?

Crispy Dalwada Recipe: घरच्या घरी नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग आणि कुरकुरीत डालवडा, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: आरबीआयच्या नव्या योजनांमुळे रुपया स्थिर होणार? एसबीआय अहवालात मोठा दावा

Prachandagad Fort : मराठा स्वराज्याची पहिली पायरी! छत्रपती शिवाजी महाराजांनी १६व्या वर्षी जिंकला 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT