मॅनहॅटनमध्ये 305 ईस्ट 95व्या स्ट्रीटजवळ भीषण स्फोट.
स्फोटानंतर 3-अलार्म आग लागली, FDNY घटनास्थळी कार्यरत.
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, काळा धूर दिसून आला.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू.
New york Explosion: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रिशायाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीआधीच (Trump Putin Alaska meet) न्यूयॉर्क शहर स्फोटाने हादरले आहे. भीषण स्फोटानंतर मॅनहॅटनमध्ये काळा धूर दिसून आला. सोशल मीडियावर या स्फोटानंतरचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामध्ये न्यूयॉर्कच्या आकाशात धुराचे दाट लोट दिसत आहेत. स्फोटाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनास्थळी शेकडो अग्निशमन कर्मचारी आणि बचावपथक उपस्थित आहे. (new york manhattan explosion before trump putin alaska meet)
न्यूयॉर्कमधील स्फोटोचे पडसाद सोशल मीडियावर पडले आहे. एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यूयॉर्क शहरातील एका रस्त्यावरून काळ्या धुराचा मोठा लोट दिसत आहे. गोंधळाच्या वातावरणात लोक त्या भागातून पळताना दिसत आहेत. या स्फोटाने अमेरिकेतली नेटकऱ्यांनी 9/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वाईट आठवणी पुन्हा जाग्या केल्या आहेत.
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सकाळी १० वाजताच्या सुमारास मॅनहॅटनमधील 305 ईस्ट 95व्या स्ट्रीटजवळ हा स्फोट झाला. ही जागा सेंट्रल पार्कपासून फार दूर नाही. स्फोटानंतर भीषण आग लागली. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एबीसी 7 च्या अहवालानुसार, तळमजल्यात काही गडबड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यूयॉर्क शहराच्या अग्निशमन विभागाने आगीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. स्फोटानंतर अग्निशामनदलाची पथके घटनास्थळी कार्यरत आहेत. FDNY चे सदस्य सध्या मॅनहॅटनमधील 305 ईस्ट 95व्या स्ट्रीटवर लागलेल्या 3-अलार्म आगीवर काम करत असल्याची माहिती न्यूयॉर्क शहराच्या अग्निशामन दलाने सोशल मीडियावर दिली आहे.
एक प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळाचा व्हिडिओ बनवला आणि काही वेळातच सोशल मीडियावर पोस्ट केला. दरम्यान, स्फोट झाला ती जागा क्यू ट्रेनच्या 96व्या स्ट्रीट स्टेशनच्या मधल्या ब्लॉकमध्ये आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? दुर्घटना आहे की दहशतवादी हल्ला? याचा तपास सध्या करण्यात येत आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणत्याही जिवितहानीचे वृत्त नाही. ट्रम्प आणि पुतीन यांच्या भेटीआधीच स्फोट झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.