jharkhand news  Saam tv
देश विदेश

साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, २ गंभीर जखमी

Jharkhand blast : साफसफाई करताना अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना झारखंडमध्ये घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

झारखंडमध्ये झाला मोठा स्फोट

स्फोटात तिघांचा मृत्यू

स्फोटाच्या घटनेने स्थानिक लोक दहशतीत

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील हबीबी नगरमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पती-पत्नी आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. स्फोटात दोघे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घरात नेमका स्फोट कसा झाला, याचा शोध घेणे सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हबीबी नगरमध्ये स्फोटाची घटना घडली. एक व्यक्ती घराच्या आवारात असलेली झुडपे साफ करताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एक जनावर देखील जखमी झालं.

स्थानिकांच्या माहितीनुसार, व्यक्ती साफसफाई करताना फावडा जमिनीवर आदळत होता. त्यावेळी एक मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की, आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला. स्फोटात तिघांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

घटनास्थळी आता परिस्थिती काय?

स्फोटानंतर परिसरात लोकांची एकच धावाधाव झाली. काहींना तातडीने स्फोटाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. पोलीस पथकाने परिसरात पाहणी केली. प्रत्यक्षदर्शींची चौकशी केली. स्फोटामुळे परिसरात दहशत पसरली आहे. स्फोट झालेल्या परिसरातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. पोलिसांच्या अंतिम तपासानंतर स्फोटाचे कारण समोर येणार आहे. त्यामुळे लोकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात मुसळधार पावसाचा फटका!

Fact Check: 10वी, 12 वी पासवाल्यांसाठी सरकारी नोकरी? केंद्र सरकारने काढली बंपर भरती?

खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

SCROLL FOR NEXT