JNU Saam TV
देश विदेश

JNU News : जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा, अनेक विद्यार्थी जखमी; VIDEO आला समोर

Massive clashes Between two Groups in JNU : निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात काही विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत.

प्रविण वाकचौरे

Delhi News :

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शुक्रवारी मध्यरात्री विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांमध्ये मारामारी झाल्याची माहिती आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

निवडणूक समिती सदस्य निवडीवरून दोन्ही गटात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या राड्यात काही विद्यार्थी जखमी देखील झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सध्या दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अभाविप आणि डाव्या विचारसरणीच्या गटामध्ये ही हाणामारी झाली. स्कूल ऑफ लँग्वेजेसमध्ये निवडणूक समिती सदस्य निवडीवरून गदारोळ झाला. (Latest Marathi News)

दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, आमच्याकडे दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तक्रारींची चौकशी करत आहोत. तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

कुलगुरूंनी म्हटलं की, जेएनयू विद्यार्थी संघाच्या निवडणुका विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केल्या जातात. संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण व्हावी ही त्यांची जबाबदारी आहे. विद्यार्थी संघटनेच्या कोणत्याही तक्रारीची IHAकडून दखल घेतली जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर त्यांचा राजकीय संबंध काहीही असला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

SCROLL FOR NEXT