Tsunami Warning  Saam tv
देश विदेश

Tsunami Warning : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरलं; आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट, भारताला किती धोका?

Tsunami Warning update : रशिया, जपान ते अमेरिका भूकंपाने हादरून गेलं आहे. आता १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आलाय.

Vishal Gangurde

रशियातील ८.८ तीव्रतेच्या भूकंपाने प्रशांत महासागरात खळबळ उडाली आहे. अणुबॉम्ब स्फोटाइतकी क्षमता भूकंपामध्ये असल्याचं बोललं जात आहे. या भूकंपानतर १२ देशांना त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांचं टेन्शन वाढलं आहे.

भूकंप आणि त्सुनामीने जगाचं टेन्शन वाढलं आहे. प्रशांत महासागर जगातील सर्वात मोठा समुद्र आहे. हा समुद्र १६५. २५ मिलियन वर्ग किलोमीटरपर्यंत पसरला आहे. या समुद्राची खोली सरासरी ४,२८० मीटर इतकी आहे. या समुद्राचे अनेक उपसागर आहेत. ओखोट्स्क समुद्र हा देखील याच समुद्राचा भाग आहे.

ओखोट्स्क समुद्राने रशियाचा कामचटका प्राय बेट, कुरील बेट, जपानचा होक्काइडो बेट, सखालिन बेट आणि पूर्व सायबेरियाचं बेटांना समुद्राने घेरलं आहे. ओखोट्स्क समुद्राला नाव हे रशियातील ओखोटा नदीवरून पडलं आहे. हा समुद्र पुढे जपानच्याही समुद्र आणि खाड्यांना जोडला जातो. ओखोट्स्क समुद्राला प्रशांत महासागराचं हृदय बोललं जात आहे. कारण ओखोट्स्क समुद्रामुळे प्रशांत महासागराला थंड पाणी, ऑक्सिजन, पोषक तत्व मिळतं. त्याचा फायदा समुद्रातील जिवांना मिळतो.

कोणत्या देशांना त्सुनामीचा धोका?

त्सुनामीच्या लाटा या प्रशांत महासागर, ओखोत्सक सागराच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचत आहे. यामुळे रशिया (कुरील बेट), जपान (होक्काइडो, तोहोकू, फुकुशिमा), हवाई (होनोलूलू, हिलो, काऊई, ओआहू), कॅलिफोर्निया( क्रेसेंट सिटी, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जिल्स), अलास्का (एल्यूशियन बेटे, अमचित्का, कोडिएक), सोलोमन बेट, चिली, इक्वाडोर, पेरू, फिलीपीन्स, गुआम आणि नॉदर्न मारियान बेटे, न्यूझीलंड या देशांना धोका निर्माण झाला आहे. मात्र, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओसियन इन्फॉर्मशेन सर्व्हिसने भारताला त्सुनामाची कोणताही धोका नसल्याचं म्हटलं आहे. या भूकंपामुळे भारत आणि अरबी समुद्राला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Awareness : चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीवर पाणी शिंपडणे पडू शकतं महागात, जाणून घ्या

Maharashtra News Live Update: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची गोव्यात सभा

Naag or Naagin : नाग की नागीण? कसं ओळखाल?

Green Tea Vs Black Tea: ग्रीन टी की ब्लॅक टी? आरोग्यासाठी काय बेस्ट?

Baramati : बारामतीत भीषण दुर्घटना! विहिरीच्या खोदकामावेळी दडी कोसळून 2 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT