Corona Mask Saam TV
देश विदेश

सावधान! कोरोना पुन्हा आला, मास्क वापरा, अन्यथा 500 रुपये दंड; 'या' राज्यात सक्ती

आता दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे.

Satish Daud

नवी दिल्ली : कोरोनाची (Corona Virus) तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतातून कोरोना हद्दपार झाला. असा अनेकांचा गैरसमज झाला. त्यातच सरकारने मास्कसक्ती हटवल्यानंतर कुणीही मास्क घालायला तयार नाही. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. देशासह अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) वाढत आहे. मुंबईसह दिल्लीत गेल्या २४ तासांत कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. अचानक मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने आता दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. (Corona Virus Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली. बुधवारी मुंबईसह दिल्लीत कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. दिल्लीत मृतांचा आकडाही वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी पुन्हा मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता दिल्लीत मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

दिल्लीत गेल्या २४ तासांत विषाणूची २ हजारहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. दक्षिण दिल्लीच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या नोटीसनुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आता बंधनकारक आहे आणि अशा भागात मास्कशिवाय दिसणार्‍यांना ५०० रुपये दंड आकारला जाईल. (Delhi Corona Latest News)

दरम्यान, दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत बुधवारी कोरोनाचे तब्बल ८५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे एक जुलैनंतरची ही सर्वाधिक दैनिक रुग्णसंख्या आहे. तसंच, बुधवारी एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूचीही नोंद झाली. (Mumbai Corona News)

त्यामुळे मुंबईतल्या आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११ लाख २९ हजार २८५ झाली असून, आतापर्यंत मुंबईत कोरोनामुळे एकूण १९ हजार ६६१ जणांचा मृत्यू झाला आहे. २४ तासांत मुंबईत ९६७० कोरोना चाचण्या केल्या गेल्या. त्यामुळे आतापर्यंत मुंबईत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची एकूण संख्या एक कोटी ७९ लाख ४ हजार १३९ इतकी झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Price Hike: सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, साखर महागली; नेमंक कारण काय?

Ashram School : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; नऊ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

MHADA Lottery: मुंबईत घर घेणाऱ्यांना म्हाडाने दिली खुशखबर, ५२८५ घरांबाबत घेतला मोठा निर्णय, वाचा

Maharashtra Live News Update: स्वातंत्र्यदिनी जळगाव शहरात प्रथमच मांसविक्रीवर बंदी !

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

SCROLL FOR NEXT