Women's Love Affair Saam TV
देश विदेश

Shocking News: इन्स्टाग्रामवरील ओळखीचं प्रेमात रुपांतर, दोन मुलांची आई तरुणीला घेऊन फरार; प्रकरण थेट पोलिसांत

Women's Love Affair: दोन मुलांच्या आईची इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत ओळख झाली. दोघींही एकमेकांच्या प्रेमात पडल्या. कुटुंबाचा विरोध असल्याने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. उत्तरप्रदेशच्या हाथरस शहरात हा अजब प्रकार घडला.

Satish Daud

Married Women Young Girl Love Affair

दोन मुलांच्या आईची इन्स्टाग्रामवरून एका तरुणीसोबत ओळख झाली. दोघींमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या. कालांतराने दोघींनीही एकमेकींचे मोबाइल क्रमांक घेतले आणि फोनवर बोलू लागल्या. प्रकरण इतकं पुढे गेलं, की दोघीही एकमेकींच्या प्रेमात पडल्या. कुटुंबियांचा विरोध असल्याने दोघींनीही घरातून पळ काढला. आता त्या लग्नावर ठाम असून प्रकरण थेट पोलिसांत गेलंय.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलाय. या अजब प्रकरणामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हाथरस येथील एका तरुणीची बरेली शहरात राहणाऱ्या महिलेसोबत इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. (Latest Marathi News)

कालांतराने दोघींही एकमेकांच्या प्रेमात पडल्या. त्यामुळे दोघींच्याही भेटीगाठी वाढल्या. नवऱ्यासोबत पटत नसल्याने संबधित महिला आपल्या दोन चिमुकल्या मुलांसोबत किरायाने राहत होती. यादरम्यान त्यांनी एकमेकींसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. मात्र, काही दिवसांनी या प्रकाराची कुणकुण तरुणीच्या कुटुंबियांना लागली.

कुटुंबियांनी तरुणीला झापत चांगलीच समज दिली. पण, तरुणी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने थेट महिलेचं घर गाठून तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. समाज आपल्याला स्वीकारणार नाही. या भीतीपोटी दोघींनीही घरातून पळ काढला. दोघीही एकमेकांसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत.

आता तरुणीचे कुटुंब तिला परत आणण्यासाठी प्रयत्न करतंय. पण ती कुणाचेही ऐकण्यास तयार नाहीये. महिलेसोबत मला लग्न करायचं आहे, असा हट्ट तरुणीने धरला आहे. त्यामुळे प्रकरण थेट पोलिसांत गेलंय. या अजब प्रकरणामुळे पोलिसांची देखील डोकेदुखी वाढली आहे. या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT