Married Woman and Young Boy Hotel Love Affair Delhi Police Shocking Information Saam TV
देश विदेश

Crime News: हॉटेलात आढळला विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह; पोलीस तपासात समोर आली चक्रावून टाकणारी माहिती

Married Women and Boyfriend Case: दिल्लीमधील एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

Satish Daud

Delhi Married Women and Boyfriend Case

दिल्लीमधील एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर समोर जी माहिती आली, ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेल्या मृत आयशाचे मेरठ येथील रहिवासी असलेल्या सोहराब (वय २८) या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. २७ ऑक्टोबर रोजी दोघांनी एका हॉटेलमध्ये ४ तासांसाठी रुम बुक केली.

मात्र, ४ तास उलटूनही दोघे बाहेर न आल्याने हॉटेल कर्मचाऱ्या रुमचा दरवाजा ठोठावला. आतून काही प्रतिसाद न आल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता, दोघांचेही मृतदेह रुममध्ये आढळून आले.

पोलिसांना दोघांजवळ एक सुसाईट नोट सापडली होती. मात्र, पोलिसांना वेगळाच संशय होता. या प्रकरणात पोलिसांनी आयशाच्या पतीची चौकशी केली. आपण सोहराब याला ओळखत नसल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

बुधवारी दोघांचाही पोस्टमार्टम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला. या रिपोर्टमध्ये आयशाची गळा दाबून हत्या झाल्याचं उघड झालं आहे. तर सोहराब याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाला, असं समोर आलं आहे. सोहराब याने आधी आयशाची हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला असावा, असं पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणात अजून काही माहिती हाती लागते का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT