maratha reservation supreme court constitution bench hearing today, maratha reservation saam tv
देश विदेश

Maratha Reservation News : मराठा समाजाची राज्य सरकारवर भिस्त; आरक्षणाच्या याचिकेवर SC त आज सुनावणी

महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण लागू केले होते.

डॉ. माधव सावरगावे

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार याचिकेवर आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी होत आहे. आजच्या सुनावणीत राज्य सरकार भूमिका मांडणार असल्याने समस्त मराठा समाजासह राज्यातील जनतेचे सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे. (Breaking Marathi News)

मराठा आरक्षणासाठी (maratha reservation latest news) आजचा निर्णायक दिवस असल्याने राज्य सरकारने (maharashtra government) आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार भूमिका मांडावी, असे आवाहन याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी साेमवारी केले होते. त्यावर आज राज्य सरकारची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल.

महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण लागू केले होते. या आरक्षणाविरोधात जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला होता.

या निर्णयाविरोधात अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील (Vinod Patil) यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शिवाय, राज्य सरकारनेही अशीच याचिका दाखल केलेली आहे. या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी आज (११ एप्रिल) होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

Mhada Home: खुशखबर! म्हाडाची बंपर लॉटरी, फक्त ५ लाखांमध्ये घर; नेमकं कुठे? अर्ज भरण्याची अंतिम तारीख कोणती?

SCROLL FOR NEXT