Maoist Blast In Chhattisgarh Saam Digital
देश विदेश

Maoist Blast In Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद, गस्त घालत असताना घडवून आणला स्फोट

Maoist Blast In Chhattisgarh: छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली आहे.

Sandeep Gawade

Maoist Blast In Chhattisgarh

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात छत्तीसगड सशस्त्र दलाचा (सीएएफ) एक जवान शहीद झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात हा स्फोट घडवून आणला आहे.

आमदाईघाटी लोहखनिज खाण परिसरात सीएएफचे जवान गस्त घालत असताना माओवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. सीएएफच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. बराचवेळ माओवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. यादरम्यान माओवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणला. यात एक जवान शहीद झाला आहे तर एक जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

सीएएफ ९ व्या बटालियनचे कॉन्स्टेबल कमलेश साहू या हल्ल्यात शहीद झाले आहेत तर व विनय कुमार जखमी झाले आहेत. कमलेश साहू मूळचे छत्तीसगडचेच असून जंजगीर- चंपा चिल्ह्याचे सुपुत्र आहेत. दरम्यान जखमी विनय कुमार यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात या हल्ल्यानंतर इंडो तिबेट बॉर्डर पोलीस आणि जिल्हा राखीव दलाच्या संयुक्त पथकाकरून परिसररात शोधमोहीम सुरू केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी असाच आत्मघातकी स्फोट घडवून आणला होता. यात ११ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Muncipal Elections : अकोल्यात महायुतीच्या जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ठरला, कोणाच्या वाट्याला किती जागा? वाचा

भाजपनं केरळमध्ये रचला इतिहास, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर विराजमान; विधानसभा निवडणुकीआधीच मोठे संकेत

Maharashtra Live News Update: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का

त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे चाटायाचे, रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल|VIDEO

Hair Care : केसांना सतत काळी मेहंदी लावल्याने काय नुकसान होते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT