Corona Restrictions In Delhi Saam Tv
देश विदेश

Corona Restrictions In Delhi: दिल्लीतील अनेक निर्बंध हटवले, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

राजधानी दिल्लीत कोरोना रोखण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध आता थोडे शिथिल करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली: राजधानी दिल्लीत कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी होताच निर्बंधांनाही दिलासा मिळू लागला आहे. बुधवारी दिल्ली आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत वीकेंड कर्फ्यू (Weekend Lockdown) उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच दुकानदारांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. बाजारांना लागू होणारी सम-विषम प्रणालीही काढून टाकण्यात आली आहे. जाणून घ्या दिल्लीत काय सुरु काय बंद-

दिल्लीत कोणत्या गोष्टीत दिलासा?

- राजधानी दिल्लीत गेल्या ३ आठवड्यांपासून वीकेंड कर्फ्यू लागू होता, तो आता उठवण्यात आला आहे. म्हणजेच वीकेंडलाही आता लोक घराबाहेर पडू शकतात.

रात्रीचा कर्फ्यूही संपला?

- दिल्लीत रात्रीचा कर्फ्यू अजूनही कायम राहणार आहे. त्यामुळे दिल्लीत रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू असेल.

बाजार उघडणार की नाही?

- दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील बाजारपेठा आधी सम-विषम मार्गाने उघडण्यास परवानगी होती. तो आता काढण्यात आला आहे. आता सर्व दुकाने दररोज उघडता येतील.

सिनेमागृहेही सुरू?

- दिल्लीत आता सिनेमा हॉल देखील उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता फक्त ५० टक्के आसनक्षमतेसहित सिनेमागृह उघडण्यास परवानगी असेल.

बार-रेस्टॉरंटसाठी काय नियम आहेत?

- दिल्लीमध्ये बार आणि रेस्टॉरंटनाही ५० टक्के क्षमतेने पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी बार बंद होते आणि रेस्टॉरंटला फक्त होम डिलिव्हरीसाठीच उघडण्याची परवानगी होती.

शाळेबाबत काय निर्णय?

- शाळा सुरू करण्याबाबत डीडीएमएच्या (DDMA) बैठकीत निर्णय होऊ शकतो, असे मानले जात होते. मात्र, दिल्लीत सध्या शाळा बंद राहणार आहेत. पुढील बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे.

लग्न समारंभाचे नियम?

- दिल्लीत आता लग्नसमारंभासाठी येणाऱ्या पाहुण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. विवाहसोहळ्यात आता 200 पाहुणे किंवा हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के लोक सामावून घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT