PM Modi Saam TV
देश विदेश

बंदुक, लेखणीच्या जोरावर सुरु असलेला नक्षलवाद संपवायला हवा; पंतप्रधान मोदींचं चिंतन शिबिरात आवाहन

पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, प्रत्येक राज्याने एकमेकांकडून शिकले पाहिजे, प्रेरणा घेऊन अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्र काम केले पाहिजे.

साम टिव्ही ब्युरो

हरियाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) शहरी नक्षलवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे. नक्षलवाद मोठी समस्या असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. हरियाणातील सूरजकुंड येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय 'चिंतन शिबिरात ते बोलत होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी देशातील सर्व राज्यांचे गृह सचिव, डीजीपी, सशस्त्र सेना दलाचे अधिकारी आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे अधिकारी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले. (National News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं की, स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत. गेल्या काही वर्षांत तळागळातील दहशतवादाचे जाळे नष्ट करण्यासाठी सर्वच सरकारांनी अत्यंत जबाबदारीने काम केले आहे. आपल्या शक्तींना एकजुटीने सामोरे जावे लागेल. आपल्याला सर्व प्रकारचा नक्षलवाद संपवायचा आहे. मग तो बंदुकीच्या जोरावर असो किंवा लेखणीने जोरावर. या सर्वांवर उपाय शोधायला हवा.

अंतर्गत सुरक्षेसाठी मुद्द्यावर सर्व राज्यांनी एकत्र काम करण्यावर भर देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्थेचा विकासाशी थेट संबंध आहे. त्यामुळे शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पुढे ते म्हणाले की, प्रत्येक राज्याने एकमेकांकडून शिकले पाहिजे, प्रेरणा घेऊन अंतर्गत सुरक्षेसाठी एकत्र काम केले पाहिजे. .

अंतर्गत सुरक्षेसाठी राज्यांनी एकत्र काम करणे हा संवैधानिक आदेश आणि देशाप्रती जबाबदारी आहे. सामान्य माणसाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांना सहकार्य करावे. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यघटनेनुसार राज्याचा विषय असला तरी तो देशाच्या एकता आणि अखंडतेशी तितकाच संबंधित आहे.

‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ची कल्पना

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोलिसांसाठी ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ही कल्पना देखील मांडली. मात्र हा निर्णय लादला जाऊ नये, तर त्याचा विचार व्हायला हवा, असं ही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

Nanded News : लोहामध्ये मतमोजणी केंद्राबाहेर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त वाढविला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT