Manipur Soldiers Killed Saam Tv
देश विदेश

Manipur News: सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाचं घरातून अपहरण, नंतर निर्घृण हत्या; मणिपूरमधील भयावह घटना...

Manipur Soldiers Killed: सुट्टीवर आलेल्या सैन्यातील जवानाचं घरातून अपहरण, नंतर निर्घृण हत्या; मणिपूरमधील भयावह घटना...

Satish Kengar

Manipur Soldiers Killed:

मणिपूरमध्ये रविवारी झालेल्या हिंसाचारात एक मोठी घटना समोर आली आहे. येथे भारतीय सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी काही सशस्त्र लोकांनी या जवानाचे अपहरण केले होते.

रविवारी त्याचा मृतदेह इंफाळ पूर्व जिल्ह्यात सापडला. पोलिसांचे म्हणणे आहे की, भारतीय लष्कराचा शिपाई काही दिवस सुट्टीवर घरी आला होता.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, शनिवारी तीन सशस्त्र लोकांनी डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्सच्या (डीएससी) सेर्टो थांगथांग कोमचे त्यांच्या राहत्या घरातून बंदुकीच्या जोरावर अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडून त्यांची हत्या केली. त्यांचा मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील खुनिंगथेक गावात पोलिसांना सापडला. (Latest Marathi News)

या जवानाच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवानाच्या कुटुंबाला शक्य ती सर्व मदत करण्यासाठी सैन्याचे एक पथक त्यांच्या घरी पोहोचले आहे. भारतीय सैन्य या भ्याड हत्येचा तीव्र शब्दात निषेध करते आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या शोकाकुल कुटुंबासोबत उभे राहील, असं सैन्याच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, थांगथांग यांनी 8व्या आसाम रेजिमेंटमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर काही वर्षांपूर्वी डीएससीमध्ये पुन्हा रुजू झाले होते. ते रजेवर आपल्या घरी आले होते आणि सोमवारी ड्युटीवर पुन्हा रुजू होणार होते. त्यांची पत्नी सोमिवॉन कोम यांनी सांगितले की, त्यांचे कुटुंब त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणासाठी हॅपी व्हॅली परिसरात राहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG cylinder : कमर्शियल गॅसचा पुरवठा बंद, कोल्हापूरमध्ये गॅस सिलिंडरची नेमकी स्थिती काय? वाचा

Gudi Padwa 2026 Time: गुढीपाडवा किती तारखेला आहे? तारीख, मुहूर्त, तिथी आताच नोट करा

Bread Custard Pudding: संध्याकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा घरीच बनवा टेस्टी ब्रेड कस्टर्ड पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

युद्धाचा परिणाम IPL स्पर्धेवर, रद्द होणार की स्थगित? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT