Manipur Liqour News  AI Image
देश विदेश

Shocking : धक्कादायक! दारू प्यायल्यानंतर प्रकृती खालावली, १५ जणांचा तडफडून मृत्यू

Manipur Toxic Liquor Tragedy Update News : मणिपूरच्या चंदेल जिल्ह्यात संशयास्पद दारू प्यायल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 180 हून अधिक नागरिक रुग्णालयात दाखल असून, प्रशासनाने दारू न पिण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

मणिपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदेल जिल्ह्यात संशयास्पद दारू प्यायल्याने 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 180 हून अधिक नागरिकांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली. सुरुवातीला पोलिसांनी आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर मृतांचा आकडा वाढल्याचे समोर आले. मृतांमध्ये 32 ते 50 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. या घटनेतील काही नागरिकांचा मृत्यू त्यांच्या घरीच झाला. तर काही जणांनी रुग्णालयात नेत असताना अखेरचा श्वास घेतला. काही रुग्णांचा चकपिकारोंग येथील कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. संबंधित नागरिकांनी प्यायलेली दारू काकचिंग जिल्ह्यातील सुगनू परिसरातून आणण्यात आल्याचा प्राथमिक तपासात खुलासा झाला आहे. या दारूची निर्मिती चंदेल जिल्ह्यात झाली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नोंदवलेल्या मृत्यूंपैकी पाच प्रकरणे सुगनू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी आरोग्यविषयक सूचना जारी केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत स्थानिक पातळीवर तयार केलेली दारू किंवा संशयास्पद ठिकाणांहून विकत घेतलेली दारू पिऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दारू प्यायल्यानंतर उलट्या होणे, पोटात दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दिसणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता जवळच्या रुग्णालयात जावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narhari Zirwal: मंत्री नरहरी झिरवाळांच्या पीएचं अखेर निलंबन, मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश दिल्यानंतर कारवाई

8th Pay Commission: ₹२१,७०० बेसिक असणाऱ्यांचा पगार होणार ₹६९ हजार? ८व्या वेतन आयोगाचा मोठा अंदाज

Maharashtra News Live Update: मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या पुस्तकातून हटवला; एनसीईआरटीविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

Winter Home Hacks : थंडीत हीटरवर पैसे खर्च कशाला? खिडक्या-दरवाज्यांतून येणारी हवा रोखण्यासाठी ५ स्वस्तात मस्त ट्रिक्स

Pressure cooker rice: मऊ, ओलसर आणि मोकळ्या भात होतच नाहीये? लक्षात ठेवा कुकरमधील पाणी आणि शिट्ट्यांचं हे परफेक्ट गणित!

SCROLL FOR NEXT