Manipur Mountaineering and Tracking Association Twitter/@ANI
देश विदेश

Manipur Landslide: मणिपूरमध्ये भीषण भूस्खलन; १८ जवानांसह २४ नागरिक ठार तर ३८ जण बेपत्ता

Manipur Landslide Video : टेरिटोरियल आर्मीच्या १८ जवानांचा समावेश आहे. पीटीआयने गुवाहाटीतील लष्करी प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, अद्याप ३८ लोक बेपत्ता आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंफाळ, मणिपूर: मणिपूर (Manipur) राज्यातल्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भंयंकर भूस्खलन (Landslide) झाले. यात शनिवारपर्यंत मृतांची संख्या २४ वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या १८ जवानांचा समावेश आहे. पीटीआयने गुवाहाटीतील लष्करी प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितले की, अद्याप ३८ लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथके तैनात करण्यात आली आहेत. लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाले आहे. (Manipur landslide Latest Updates)

हे देखील पाहा -

प्रवक्त्याने सांगितले की, या अपघातात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जूनियर कमीशंड ऑफिसर - जेसीओ) देखील आहे. हवाई दलाची दोन विमाने आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह १४ जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. एका जवानाचा मृतदेह रस्तेमार्गाने मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात पाठवला जाणार आहे. तसेच त्यांनी सांगितले की, जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनीही शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्टेशनजवळील भारतीय लष्कराच्या १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पजवळ बुधवार-गुरुवारी रात्री हे भूस्खलन झाले. येथे जिरीबाम ते इंफाळ दरम्यान रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. हे सैनिक त्याच्या संरक्षणासाठी तैनात होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: महापालिका निवडणुकीआधीच बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, अविनाश ढाकणे BMC चे नवे अतिरिक्त आयुक्त

Maharashtra Politics : भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; चव्हाणांकडून बालेकिल्ल्याला खिंडार, VIDEO

Shocking: सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या, नव्या घरात घेतला गळफास; १० पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण...

Vladimir Putin: परम बलशाली पुतीनची महिला ब्रिगेड, रशियातील 10 शक्तीशाली महिला

MahaYuti Face Clash: महायुतीत वाहताहेत स्वबळाचे वारे; निवडणुकीआधी भाजप-सेना युती तुटणार?

SCROLL FOR NEXT