Manipur Clashes Saam Tv News
देश विदेश

Manipur Clashes: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, 9 जणांचा मृत्यू; 10 जखमी

Manipur Latest News: इम्फाळ पूर्वेच्या (imphal east) खमेनलोक भागामध्ये हिंसाचार झाला.

Priya More

Manipur News: मणिपूरमध्ये महिनाभरापासून उसळलेला हिंसाचार (Manipur Clashes) थांबायचे नाव घेत नाही. मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराची घटना समोर आली आहे. इम्फाळ पूर्वेच्या (imphal east) खमेनलोक भागामध्ये मध्यरात्री हिंसाचार झाला. हिंसाचारादरम्यान करण्यात आलेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मणिपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात एका महिलेसह नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खामेनलोक भागात रात्री उशिरा झालेल्या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी इंफाळला नेण्यात आले आहे. हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी काहींच्या अंगावर जखमांच्या खुणा आहेत आणि अनेकांना गोळ्या लागल्या आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा फुटीरत्यावाद्यांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये 9 जण ठार झाले तर 10 जण जखमी झाले. यादरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरांना आग लावल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तामेंगलाँग जिल्ह्यातील गोबाजंगमध्येही अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. इम्फाळ पूर्व पोलीस अधीक्षक (एसपी) शिवकांत सिंग यांनी सांगितले की, मृतांचे पोस्टमॉर्टम केले जात आहे. जेणेकरून त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अचूकपणे समजू शकेल.'

सशस्त्र फुटीरत्यावाद्यांनी मंगळवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास इम्फाळ पूर्व जिल्हा आणि कांगपोकी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खामेनलोक भागातल्या गावकऱ्यांना घेरले आणि त्यांच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना इंफाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे क्षेत्र मेईटी-बहुल इम्फाळ पूर्व जिल्हा आणि आदिवासी बहुल कांगपोकपी जिल्ह्याच्या सीमेवर आहे.

दरम्यान, पाच दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका 67 वर्षीय महिलेचाही समावेश होता. दरम्यान, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने मणिपूर सरकारने अधिसूचित केलेल्या जातीय हिंसाचाराच्या सहा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापन केली आहे. या हिंसाचार प्रकरणाचा एसआयटीकडून कसून तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

SCROLL FOR NEXT