Suitcase Saam tv
देश विदेश

Viral Video: प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवून हॉस्टेलच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न, मात्र गार्डने पकडले अन्..

मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांच्या वसतिगृहातून निलंबित करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मणिपाल - कर्नाटकातील (Karnataka) मणिपाल शहरातील एका इंजीनिअरिंगच्या विद्यार्थ्याने एखाद्या चित्रपटा प्रमाणे आपल्या गर्लफ्रेंडला सूटकेसमध्ये लपवून मध्यरात्री वसतिगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वसतिगृहाच्या गेटवर या तरुणाची बॅग तपासली असता केअरटेकरने या जोडप्याला पकडल्याची घटना घडली आहे. सुरक्षा रक्षकाने विद्यार्थ्याला (Student) बॅगमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने सांगितले की, त्यात ऑनलाइन ऑर्डर केलेल्या वस्तू आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकाला त्याच्यावर संशय आला.

प्रियकराने प्रेयसीला सुटकेसमध्ये लपवले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॅगमध्ये नाजूक वस्तू आहेत असे सांगून विद्यार्थ्यानेबॅग न उघडू देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र गार्डला संशय आल्याने त्याने बॅगमध्ये कायआहे हे पाहण्यासाठी बॅग उघडली आणि त्या सुटकेसमधून एक मुलगी बाहेर आली. दरम्यान विध्यार्थी आणि महाविद्यालयाची नावे उघड करण्यात आलेली नाहीत. तरुणाने आपल्या प्रेयसीला बॅगमध्ये लपवले होते, जिला तो वसतिगृहातून बाहेर काढू इच्छित होता, असा दावाही करण्यात आला होता. मुलगा आणि मुलगी दोघांनाही त्यांच्या वसतिगृहातून निलंबित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.हे दोघे देखील त्यांच्या घरी परतले आहेत. दरम्यान हा व्हिडिओ कधीचा आहे याबाबद अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT