Lottery Viral News x
देश विदेश

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Viral News : एका व्यक्तीने लॉटरीमध्ये १२ कोटींहून अधिक पैसे जिंकले. लॉटरीमध्ये मिळालेले पैसे त्याने लाईव्ह स्ट्रीमवरील महिलांवर उडवले. संतापलेल्या बायकोने थेट घटस्फोटाचा अर्ज केला.

Yash Shirke

  • एका व्यक्तीने १२ कोटींची लॉटरी जिंकून सर्व पैसे महिला लाईव्ह-स्ट्रीमरवर उडवले.

  • संतापलेल्या बायकोने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत रेल्वे स्टेशनवर रंगेहात पकडले.

  • फसवणूक लक्षात आल्यानंतर पत्नीने थेट घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला.

Viral : एका व्यक्तीने १२.३ कोटी रुपयांची लॉटरी जिंकली. लॉटरी जिंकल्याच्या आनंदात या व्यक्तीने पैसे नको त्या ठिकाणी खर्च करायला सुरुवात केली. त्याने पैशांचा मोठा भाग एका महिला लाईव्ह-स्ट्रीमरवर खर्च केला. लाईव्ह-स्ट्रीमवर पैसे खर्च केल्याने त्याची बायको संतापली. रागाच्या भरात तिने आता घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

ही घटना चीनमध्ये घडली असून घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या महिलेचे नाव युआन असे आहे. नवऱ्याला लॉटरी लागल्याचे समजल्याने ती खूप खुश झाली. 'आता तू काहीही खरेदी करु शकतेस हे बँकेचे कार्ड घे, या कार्डमध्ये ३.६ कोटी रुपये आहेत असे म्हणत नवऱ्याने मला कार्ड दिले. या लॉटरी प्रकरणामुळे आम्ही आनंदी होतो. पण या आनंदावर विरजण पडले', असे युआनने सांगितले.

काही दिवसांनी माझ्या नवऱ्याच्या वागण्यात बदल व्हायला सुरुवात झाली. तो दिवसा जुगार खेळू लागला आणि रात्री महिलांचे अश्लील लाईव्ह-स्ट्रीम पाहू लागला. त्याने लाईव्ह स्ट्रीम्सवर खूप पैसे खर्च केले. पण मी त्याकडे लक्ष दिले नाही, पण एका महिला लाईव्ह स्ट्रीमरसोबत फिरताना मी नवऱ्याला पकडले, असे युआनने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

युआनच्या नवऱ्याने त्या महिला लाईव्ह-स्ट्रीमरला १४ लाख रुपये दिले असल्याचे म्हटले जात आहे. ते दोघेही चार दिवस फिरायला गेले होते. त्या सर्व गोष्टींचा खर्चही युआनच्या नवऱ्यानेच केला. त्या दोघांनी युआनने एका रेल्वे स्टेशनवर पकडले. नवऱ्याचा फोन तपासताना युआनला अश्लील चॅट्स आढळले. त्याने दिलेल्या बँकेच्या कार्डमध्ये पैसे नसल्याचेही तिला समजले. या सर्व घटनांमुळे तिला धक्का बसला आणि तिने घटस्फोट घेण्यासाठी अर्ज केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT