एका बिडीसाठी महिलेचा भर रस्त्यात खून Saam Tv
देश विदेश

एका बिडीसाठी महिलेचा भर रस्त्यात खून

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये CCTV कैद

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- केवळ एका बिडीसाठी नशेबाज आरोपीने एका महिलेवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या नशेबाज आरोपीने भर बाजारपेठेत, सर्वांसमोर या महिलेचा खून केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये CCTV कैद झाली आहे. दरम्यान या प्रकणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

नेमकं काय आहे प्रकरण ?

विभा नावाची एक महिला दिल्लीतील दाबरी परिसरात तिच्या पतीसोबत भाजीपाला आणि किरकोळ किराणा मालाची विक्री करण्याचे काम करत होती. ही महिला गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात व्यवसाय करत होती. विभाच्या दुकानात दीपक नावाचा एक नशेबाज तरुण आला. त्याने विभाकडे बिडीची मागणी केली. त्याची हालत पाहून विभाने त्याला बिडी देण्यास नकार दिला.

बिडी देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादावादीला सुरुवात झाली. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर या माथेफिरू व्यक्तीने त्याच्या बॅगेतील धारदार शस्त्र काढून महिलेवर निर्घृण वार केले आणि या अपघातात या महिलेचा मृत्यू झाला. आरोपी प्लंबिंगचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस police अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीत

Ankita Lokhande : नाकात नथ अन् कानात बुगडी; अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज, पाहा PHOTO

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Shweta Tiwari: 'चाळीशीतही क्यूट दिसतेस' श्वेता तिवारीचे नवीन फोटो चर्चेत

SCROLL FOR NEXT