धक्कादायक! दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण ऐकालं तर व्हाल थक्क
धक्कादायक! दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण ऐकालं तर व्हाल थक्क  Saam Tv
देश विदेश

धक्कादायक! दिराने डॉक्टर वहिनीवर गोळ्या झाडत स्वतःही केली आत्महत्या; कारण ऐकालं तर व्हाल थक्क

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : क्षुल्लक कारणावरुन दिराने आपल्या वहिनीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर घडली आहे. यानंतर त्याने स्वतः देखील आत्महत्या केली आहे. ही घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) देवास जिल्ह्यामधील घडली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (police) दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत. घटना देवासच्या गोपालपुरा (Gopalpura) गावातील (village) आहे.

हे देखील पहा-

यामध्ये संदीप नावाच्या व्यक्तीचा भाऊ विजय याचे आपल्या वहिनीबरोबर जेवण गरम करण्यावरुन भांडण (Quarrel) लागले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयने आपल्या वहिनीला जेवण गरम करण्यास सांगितले होते. मात्र, तिने नकार दिला. यानंतर BHMS डॉक्टर असलेली वहिनी आपल्या क्लिनिकमध्ये निघून गेली.

मिळालेल्या माहितीनुसार काही वेळातच तिचा दीर क्लिनिकमध्ये पोहोचला आणि त्याने वहिनीवरच गोळी झाडली (firing) आहे. यानंतर त्याने आपला भाऊ संदीपला फोन करून रीनाला गोळी मारल्याचे सांगितले होते. यानंतर फोन कट करून, त्याने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केली आहे. आसपासचे लोक जेव्हा क्लिनिकमध्ये पोहोचले तेव्हा रीना रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. तिला रुग्णालयात (hospital) नेण्यात आले होते.

मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. पोलिसांनी सध्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सुरुवातीच्या तपासामध्ये हे प्रकरण घरगुती वादाचे जाणवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी विजयच्या मृतदेहाजवळून घटनेत वापरण्यात आलेली गाडी आणि बंदुक (Gun) दोन्ही जप्त केले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Menstrual Care: मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात का? 'हे' उपाय केल्यास पोटदुखी कमी होईल

Lok Sabha Election: काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, केसीआर यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

Today's Marathi News Live : ​दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यात हालवले

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

Benifits of Jaljeera: रोज एक ग्लास जलजीरा पिण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

SCROLL FOR NEXT