Crab  Saam Tv
देश विदेश

Viral News: मुलीच्या प्रेमापोटी वडिलांनी खाल्ला जिवंत खेकडा, दोन महिन्यांनी वेदना असह्य झाल्याने गाठलं हॉस्पिटल, डॉक्टरही चक्रावले

खेकड्याला जिवंत खाल्यांने व्यक्तीला थेट दवाखान्यात जावं लागलं आहे. चीनमध्ये ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बीजिंग : खेकड्याने मुलीला चावा घेतल्याने संतापलेल्या वडिलांनी बदला घेण्यासाठी जिवंत खेकडा खाल्ला. मात्र बदला घेण्याचा हा मार्ग वडिलांच्या चांगलाचा अंगलट आहे. कारण खेकड्याला जिवंत खाल्यांने त्यांना थेट दवाखान्यात जावं लागलं आहे. चीनमध्ये ही घटना घडली आहे.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, साऊथ कोस्ट प्रांतात राहणाऱ्या 39 वर्षीय लू यांनी एक छोटा खेकडा गिळला. दोन महिन्यांनंतर त्यांना भयंकर पाठदुखीचा त्रास सुरु झाला. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. लू यांच्या वैद्यकीय अहवालात त्याच्या छाती, पोट, यकृत आणि पचनसंस्थेत बदल झाल्याचे दिसून आले. मात्र डॉक्टरांना नेमके कारण समजत नव्हतं.

रुग्णालयातील डायजेस्टिव्ह सिस्टम विभागाचे संचालक डॉ काओ कियान यांनी सांगितलं की, आम्ही त्यांना वारंवार विचारले होते की तुम्ही कधी काही विचित्र पदार्थ खाल्ले आहे का? ज्यामुळे अॅलर्जी होऊ शकते. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. पण नंतर लू यांच्या पत्नीने संपूर्ण घटना सांगितली. त्यांनी मुलीला चावा घेतल्यानंतर जिवंत खेकडा खाल्ल्याची डॉक्टरांना माहिती दिली.

डॉ. काओ म्हणाले की, लू यांच्या मुलीला पाण्यात एका लहान खेकड्याने चावा घेतला. त्यानंतर त्यांनी रागाच्या भरात हे कृत्य केलं. मात्र त्यांच्या रक्ताच्या चाचण्यांवरून असे दिसून आले की लू यांना किमान तीन पॅरासिटिक इन्फेक्शन झाले आहेत, जे कच्चे मांस खाल्ल्यानंतर होते. डॉक्टरांनी लोकांना जिवंत खेकडा खाऊ नये असा सल्लाही दिला आहे.

चीनमध्ये खेकडे खाणे सामान्य बाब आहे. चीनच्या पूर्वेकडील भागात मॅरिनेटेड खेकडे देखील खाल्ले जातात. ड्रंकन क्रंब डिश देखील प्रसिद्ध आहे. यात खेकडे दारूमध्ये मॅरिनेट केले जातात. डॉक्टरांनी सांगितलं की, ते काही प्रमाणात सुरक्षित आहे. कारण दारूमुळे पॅरासाईट्स मरु शकतात. मात्र हे देखील पूर्णपणे सुरक्षित नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra News Live Update: Mumbai: पवई पोलिसांची अवैध डिझेल साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई.

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT