Man Collapse after Heart Attack during Dance/Social Media SAAM TV
देश विदेश

लग्नात नाचता नाचता हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा VIDEO

लग्नात नाचताना हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वाराणसीत घडलीय. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

वृत्तसंस्था

Uttar Pradesh Viral News : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एका तरुणाचा लग्न सोहळ्यात डान्स करताना मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा तरूण काही लोकांसोबत लग्न सोहळ्यात डान्स करत होता. अचानक त्याला चक्कर आली. तो जागेवरच खाली कोसळला. बेशुद्धावस्थेत त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेलं.

कुटुंबीय आणि नातेवाइकांनी तरूणाला तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याला तपासले. त्यानंतर त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. (Viral News)

मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या पिपलानी कटरा औघडनाथ तकियाजवळ २५ ऑक्टोबरला लग्न होते. त्यात सहभागी झालेला ४० वर्षीय मनोज हा नातेवाइकांसोबत डान्स करत होता. नाचता नाचता त्याला अचानक चक्कर आल्यासारखं झालं. त्यानंतर तो जमिनीवरच कोसळला. मनोजला खाली पडताना बघून सोबत असलेल्या महिला जोरात किंचाळल्या. त्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाइकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. (Latest Marathi News)

मनोजला तपासून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मनोजचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मनोजच्या मृत्यूनंतर कुटुंबीय आणि नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

व्हिडिओ बघा -

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. नाचताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटनांचे व्हिडिओ समोर आले आहेत. राजस्थानमध्येही एका लग्न सोहळ्यात स्टेजवरच नाचताना युवकाचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये जम्मूमध्ये अशीच एक घटना घडली होती. तेथे पार्वतीची भूमिका करणाऱ्या २० वर्षांच्या तरुणाचा स्टेजवरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT