Madhya Pradesh Twitter
देश विदेश

Madhya Pradesh: नशेत मोबाईल टॉवरवर चढला तळीराम; पोलिस येताच...

सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना या व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आले.

वृत्तसंस्था

मध्य प्रदेश - इंदूरमधील विजय नगर भागात शुक्रवारी (21 जानेवारी) एक व्यक्ती दारूच्या नशेत मोबाईल टॉवरवर चढला. सुमारे दीड तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना या व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आले. यावेळी टॉवरखाली मोठी गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कैलास नामक व्यक्ती विजय नगर भागातील एका 50 फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला होता.

प्राप्त माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी कैलासशी बोलणे सुरू केले आणि दीड तासाच्या प्रयत्नानंतर तो खाली उतरला. विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी तहजीब काझी यांनी सांगितले की, जेव्हा तो व्यक्ती मोबाईल टॉवरवरून खाली उतरला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. आम्ही त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. तपासानंतरच ही व्यक्ती मोबाईल टॉवरवर का चढली होती याचे कारण स्पष्ट होणार असे त्यांनी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes Fruits Care: डायबेटीजच्या रुग्णांनी कोणती फळं खावीत? तज्ञांनी सांगितली यादी, एकदा वाचाच

Makeup Tips: मेकअप केल्यावर चेहरा काळा पडतो? मग या सोप्या स्टेप्स करा फॉलो पार्टीमध्ये तुम्ही दिसाल ग्लॅमरस

Director Arrested: ३० कोटींच्या फसवणुक प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक आणि पत्नीला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Goa Nightclub Fire: गोव्याच्या नाईट क्लबमध्ये 'अग्नीतांडव' नाईट क्लबला आग कशी लागली?

Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला हादरा; बडा नेता फोडला, राजकीय समीकरण बदलणार

SCROLL FOR NEXT