ममतांच्या भेटीचा मविआ सरकारवर परिणाम होणार नाही- अरविंद सावंत Saam TV
देश विदेश

ममतांच्या भेटीचा मविआ सरकारवर परिणाम होणार नाही- अरविंद सावंत

ममतांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी अर्धवट राष्ट्रगीत म्हणल्याचा आरोप करत भाजपचे नेते ममतांवर टीका करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. त्यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर आपले मत मांडले. ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याबाबत बोलताना सावंत म्हणाले ''ममतांच्या भेटीने कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. आपला देश लोकशाही मानणारा आहे. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघडी सरकारवर याचा काहीच परिणाम होणार नाही.'' ममतांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी अर्धवट राष्ट्रगीत म्हणल्याचा आरोप करत भाजपचे नेते ममतांवर टीका करत आहेत.

भाजप नेत्यांनी ममता बॅनर्जी महाराष्ट्रातले उद्योग कोलकातामध्ये घेवून जायला आल्या असल्याची टीका केली होती. त्यावर बोलताना अरविंद सावंत म्हणाले ''महाराष्ट्रातून अनेक कंपन्या गुजरातमध्ये गेल्या. वांद्रे येथील financial center गेलं, एअर इंडिया कार्यालय गुजरातमध्ये गेलं. तेव्हा तर भाजपची सत्ता होती. मग आमचे कोलकाताशी संबंध लाल बाल पाल यांच्यापासून आहेत. मुख्यमंत्री आहेत त्यांचे शिवसेनेशी ऋणानुबंध आहेत. कंगना राणावत पेक्षा ममता बॅनर्जींचे स्वागत करतो.''

संसदेचं हिवाळी अधीवेशन सुरु आहे. त्यात विनायक राऊत यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केलं. त्यावर बोलतना सावंत म्हणाले की उत्तम भाषण केलं, केंद्र सरकारने दुजाभाव केला त्याचे वाभाडे राऊतांनी काढले. गुजरात, यूपीला 100 कोटी मदत केली त्याचे सत्य समोर आणले. शेतकऱ्यांना कसे फसवतात हे राऊतांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्र अजूनही दुजाभाव करत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT