West Bengal plunges into political turmoil as Governor dismisses the entire assembly following Mamata Banerjee’s refusal to resign. saam tv
देश विदेश

संपूर्ण विधानसभा बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय, देशाच्या राजकारणात खळबळ

West Bengal Assembly Was Dismissed By Governor: पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय उलथापालथ! ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी संपूर्ण विधानसभा बरखास्त केली.

Omkar Sonawane

ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी पश्चिम बंगालमधील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केले आह. बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी दावा केला होता की आम्ही ही निवडणूक हारली नसून आमची लढाई ही निवडणूक आयोगासोबत होती. मात्र एसआयआरच्या माध्यमातून 90 लाख मत वगळली गेली. यामुळे आमचा हा पराभव मान्य नाही. यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी हा निर्णय घेतला.

ममता बॅनर्जी यांनी असाही आरोप केला की, तृणमूल कॉँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक लढवली नाही, उलट भाजपसाठी काम करणाऱ्या निवडणूक आयोगाशीच संघर्ष केला. त्या म्हणाल्या, माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आमचा पराभव जनतेच्या कौलामुळे झाला नाही तर एका षडयंत्रामुळे झाला आहे. मी हरलेली नाही आणि मी लोकभवनात जाणार नाही. सुमारे 100 जागांवर मत चोरी करण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

बंगालमधील पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, त्या आता राष्ट्रीय स्तरावर विरोधी आघाडी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करतील. त्या म्हणाल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी मला फोन केला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही माझ्याशी संवाद साधला.

पश्चिम बंगालमधील पहिल्या भाजप सरकारचा शपथविधी सोहळा 9 मे रोजी कोलकत्ता येथील ब्रिगेड परेड मैदानावर होणार आहे. मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार असून सुमारे 4000 पोलीस कर्मचारी तैनात असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि भाजपशासित अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात ऑनलाइन पेमेंटच्या बहाण्याने दुकानदाराला गंडा

Ration Scheme: मोफत रेशन योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, योजनेत तीन मोठे बदल

MLC Election : महायुतीत पुन्हा रस्सीखेच! भाजप-शिंदेंची शिवसेना आमनेसामने; पाहा कुणाकडे किती मतांची संख्या

थकवा झटक्यात निघून जाईल! शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी सकाळी प्या 'ही' नॅचरल टी

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन; नंतर फडणवीसांनी बीएमसीमधील शिंदे गटाच्या प्लॅनला लावला ब्रेक

SCROLL FOR NEXT