mamata banerjee Saam tv
देश विदेश

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ; केंद्रीय गृहमंत्र्यांवरील टीका भोवली, पोलिसांत FIR दाखल

mamata banerjee : माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांवरील टीकेनंतर त्यांच्याविरोधात सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Vishal Gangurde

ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ

माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये FIR

ममता बॅनर्जींच्या विरोधात FIR दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कोलकातामध्ये एका आंदोलनादरम्यान बांगलादेशातील हाय-प्रोफाइल हत्याकांडात केंद्रीय गृह मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पोलिसांत FIR नोंदवण्यात आला आहे. सिलीगुडीच्या सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये एका वकिलांनी हा एफआयआर नोंदवला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कोलकाताच्या धर्मतालामध्ये २ जून २०२६ रोजी टीएमसीने एक आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी धक्कादायक दावा केला. बांगलादेशात झालेल्या एका हत्याकांडातील आरोपींची नावे माहीत आहेत. मी त्याबाबत कोणताही खुलासा करणार नाही. त्यामुळे बांगलादेशाच्या राजकारणात उलथापालथ होईल. त्यांनी अप्रत्यक्षरित्या बांगलादेशचा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान बिन हादी याच्या हत्येविषयी भाष्य केलं.

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी यांनी आंदोलनादरम्यान म्हटलं की, 'एसटीएफने बांगलादेशातून एका आरोपीला अटक केली. यावरून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. मी दुसऱ्या देशाविषयी बोलत नाही. माझा मुद्दा असा आहे की, काही लोक मेघालयच्या रस्तेमार्गे पश्चिम बंगालमध्ये आले. मी इतक्या दिवस काही म्हटलं नाही. परंतु आज कौर्याने सीमा गाठली आहे. त्यामुळे मी बोलत आहे. माझ्याकडे खूप काही माहिती आहे'.

ममता बॅनर्जी यांच्या दाव्यानंतर सिलीगुडीचे वकील रिंकी चॅटर्जी सिंह यांनी सिलीगुडी सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. वकिलांचं म्हणणं आहे की, ममता बॅनर्जी यांनी भाष्य करताना केंद्रीय गृह मंत्रालयावर आरोप केला. वकिलांचा आरोप आहे की, सार्वजनिक मंचावरून संवेदनशील माहिती सांगितल्यास देशाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते'. याच वकिलांनी मागील आठवड्यात देखील सायबर क्राइम पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Eletion: मोठी बातमी! ऐनवेळी निवडणुकीतून माघार, ठाकरेंनी थेट अ‍ॅक्शन घेतली

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

ठाकरे गटाच्या नेत्यावर पोलीस स्टेशनच्या आवारातच हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Weather: मान्सून 48 तासात तळकोकणात धडकणार, महाराष्ट्र कधी व्यापणार?

Madhuri Dixit: वयाच्या 59 वर्षीही माधुरीचा जलवा कायम; धकधक गर्लच्या डेनिम साडी लूकने चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT