Maldives India Controversy Saam Digital
देश विदेश

Maldives India Controversy: आम्हाला कोणीही उठून धमकवू शकत नाही, मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा रोख भारताकडे

Maldives India Controversy: मालदीव एक छोटासा देश असू शकतो म्हणून मालदीवला धमकावण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही, असं वक्तव्य मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतल्यानंतर केलं आहे.

Sandeep Gawade

Maldives India Controversy

मालदीव एक छोटासा देश असू शकतो म्हणून मालदीवला धमकावण्याचा परवाना कोणालाही मिळत नाही, असं वक्तव्य मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी चीनच्या दौऱ्यानंतर मायदेशी परतल्यानंतर केलं आहे. मात्र त्यांच्या बोलण्याचा रोख भारताकडे असल्याचं मानलं जात आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही.

मोहम्मद मुइज्जू हे चीनचे समर्थक मानले जातात. नुकताच पाच दिवसांच्या चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर लगेचच त्यांचा चीन दौरा झाला. या मुद्द्यावरून सध्या भारत आणि मालदीवमध्ये राजनैतिक वाद वाढत आहेत.

भारतात मालदीववर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे मुइज्जू यांनी चीनला मालदीवमध्ये अधिकाधिक चिनी पर्यटक पाठवण्याचं आवाहन केलं होतं. कोविडपूर्वी आपल्या देशात येणारे बहुतेक पर्यटक हे चीनचे होते, असं मालदीव बिझनेस फोरमला संबोधित करताना मुइज्जू म्हणाले होते. मुइझ्झू यांचा चीन हा पहिला दौरा होता आणि हा दौरा मालदीवच्या तीन मंत्र्यांनी लक्षद्वीप दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड सुरू झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दररोज कोट्यवधींचा फटका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून मालदीव सरकारच्या काही मंत्र्यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर मालदीववर बहिष्काराचा ट्रेंड सुरू झाला असून मालदीवला दररोज करोडो रुपयांचा फटका बसत आहे. ज्या देशाचा महसूल ज्या देशाचा महसूल केवळ पर्यटक आणि पर्यटनातूनच येतो, त्या देशाची अवस्था बिकट होते हे उघड आहे. बायकॉटच्या निर्माण झालेल्या ट्रेंडनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी मालदीवने तेथील प्रवासाचा खर्च निम्म्यावर आणला आहे, तरीही भारतीय पर्यटक मालदीवमध्ये जाण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे मालदीव सरकार अडचणीत आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: मृत व्यक्तीच्या फोटोसमोर अगरबत्ती लावावी की नाही?

Maharashtra Live News Update: परभणीत भर पावसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पिकांच्या नुकसानीची पाहणी

Video : तेरे जैसा यार... दंडाधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून गाणं गाणे भोवलं! तहसीलदाराचे निलंबन

GST : छत्र्या, मोबाइल, कपडे ते सायकल, सिमेंट होणार स्वस्त, वाचा केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन

मेट्रोच्या एका कोचची किंमत किती असते?

SCROLL FOR NEXT