Money  Saam tv
देश विदेश

लाडक्या बहि‍णींना मोठा झटका; १९ लाख महिला १०००० रुपयांपासून वंचित, नेमकं काय घडलं?

bihar latest news : लाडक्या बहि‍णींना मोठा झटका बसलाय. १९ लाख महिलांना १०००० रुपयांपासून वंचित राहावं लागणार आहे.

Vishal Gangurde

बिहारमध्ये लाखो महिलांना धक्का

१ कोटी ५६ लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये

१९ लाख महिला दहा हजार रुपयांपासून वंचित

बिहारच्या निवडणुकीत एनडीएला प्रचंड बहुमत मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेची अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत १ कोटी ५६ लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर तब्बल १९ लाख महिलांना या योजनेसाठी अर्ज केले. मात्र, आता सरकारने हे पोर्टलच बंद केल्याचं समोर आलं आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक सहाय्य दिलं जातं होतं. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १ कोटी ५६ लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यात आले आहेत. या योजनेमुळे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महिलांनी 'एनडीए'ला भरभरुन मते दिली होती. ही योजना बिहारच्या राजकारणात गेमचेंजर ठरली होती. आता या योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. तसेच योजनेचं पोर्टल देखील ३१ डिसेंबरपासून बंद करण्यात आलं आहे.

विरोधकांचा आरोप आहे की, 'निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. आता सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद केली आहे. या योजनेसाठी १ कोटी ५६ लाख महिलांनी अर्ज केला होता. या महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले'.

'अनेकांच्या खात्यात पैसे पाठवल्यानंतर आणखी १९ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर आता पोर्टल बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे नव्याने कोणत्याही महिलेला अर्ज करता येणार नाही, असे विरोधकांनी सांगितले. त्यामुळे अर्ज केलेल्या १९ लाख महिलांना पैसे मिळणार का, हे देखील अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

तत्पूर्वी, बिहार निवडणुकीच्या आधी म्हणजे २६ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बिहारच्या ७५ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पाठवले होते. त्यानंतर एका आठवड्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी २५ लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले होते. तर ३८ नोव्हेंबर रोजी १० लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये पाठवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil Kapoor Daughter: अनिल कपूरच्या लेकीला मोठा धक्का; कोट्यवधींचे हिऱ्यांचे कानातले चोरीला, सिनेसृष्टीत खळबळ!

Maharashtra News Live Update: जिल्ह्यावरील पाणीटंचाईचे संकट गडद

Hardik pandya trade: आधी हार्दिकला घेतलं आता यशस्वीवर डाव खेळणार? MI-RR मध्ये मोठ्या ट्रेडची चर्चा

पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल, काय निर्णय घेतला?

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल विरोधात लागला; ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार की नाही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT