Gujarat Navsari Bus Accident ANI
देश विदेश

Bus Accident : भयंकर! धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका; थेट कारला दिली धडक, ९ जणांचा जागीच मृत्यू

चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या कारला धडकली. या घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Gujarat Navsari Bus Accident : भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या कारला धडकली. या घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही सूरतहून वलसाडच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या फॉर्च्यूनर कारमधून ९ जण प्रवास करीत होते.

दरम्यान, बस वेस्मा गावाजवळ आली असता, बसचालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बसने थेट फॉर्च्यूनर कारला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर मृतांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी दोन्ही वाहने कापावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींसह INDIA ब्लॉकचे ८ नेते सर्वोच्च न्यायालयाकडे पायी रवाना

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना ₹२१०० सुरू होणार, नेमकं सत्य काय? सरकारनं दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT