देश विदेश

Politics : आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का; पक्षातील बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Delhi Politics : आम आदमी पक्षाला सर्वात मोठा धक्का बसलाय. पक्षातील बड्या नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

आम आदमी पक्षाला दिल्लीत बसला मोठा धक्का

आपचे राजेश गुप्ता यांचा भाजपमध्ये प्रवेश

दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Delhi AAP News : आम आदमी पक्षाला दिल्लीत सर्वात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पक्षाचे उपाध्यक्ष राजेश गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत 'आप'च्या राजेश गुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच राजेश गुप्ता यांनी अरविंद केजरीवाल आणि सौरभ भारद्वाज यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

राजेश गुप्ता यांच्याकडे पक्षाच्या उपाध्यक्षपदासहित राष्ट्रीय प्रवक्तेपद देखील त्यांच्याकडे होतं. तसेच ते कर्नाटकात आम आदमी पक्षाचे प्रभारी देखील होते. भाजपमध्ये प्रवेश करताच राजेश गुप्ता यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला. आम आदमी पार्टी आता भ्रष्ट झाली आहे. ते मूळ विचारधारेपासून भरकटले आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.

राजेश गुप्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले. अरविंद केजरीवाल आता फोन देखील उचलत नाहीत. त्यांच्याशी संपर्क देखील साधून दिला जात नाही. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज देखील संवाद साधत नाहीत. या दोघांनी १० वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे,असा आरोप त्यांनी केला.suggest

तत्पूर्वी, यंदा आम आदमी पक्ष हा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभूत झाला. तर २०२० साली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ६२ जागा जिंकून सरकार स्थापन केलं होतं. यंदा पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. यंदा भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दिल्लीत आम आदमी पक्षाच्या प्रतिमेलाही धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flax Seeds Ladoo Recipe : फक्त १५ मिनिटांत बनतील पौष्टिक जवसाचे लाडू, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Shilpa Shinde Comeback: शिल्पा शिंदे परतली? 'भाभी जी घर पर है' शोमध्ये दिसणार खरी 'अंगुरी भाभी'

Maharashtra Politics: पुण्यात मोठा राजकीय भूकंप, पालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता भाजपच्या वाटेवर

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT