China Car Accident Saam TV
देश विदेश

Viral News : अरे बापरे! ब्रिजवर जवळपास २०० हून जास्त वाहनं धडकली; महाभयंकर अपघाताचा VIDEO पाहा

एका वाहनाने विरुद्ध दिशेला येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पाठीमागून येणारी २०० हून अधिक वाहनं एकमेकांना धडकली.

Satish Daud

Viral News : हिवाळ्यात धुके असल्यास वाहन चालवणे अवघड होऊन बसते. धुक्यांमुळे चालकाला रस्ता नीट दिसत नसल्याने अपघातही घडतात. त्यातच महामार्गावर समोरून येणाऱ्या एखाद्या वाहनाला अपघात झाला, तर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना याचा अंदाज येत नाही. अशा स्थितीत अनेक वाहनं एकापाठोपाठ एक धडकतात. असाच काहीसा प्रकार चीनमध्ये घडला आहे. (Latest Marathi News)

चीनच्या हेनान प्रांतातील झेंग्झौ शहरातील एका पुलावर भीषण अपघात झाला आहे. समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने विरुद्ध दिशेला येणाऱ्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर पाठीमागून येणारी २०० हून अधिक वाहनं एकमेकांना धडकली.

बुधवारी (२८ डिसेंबर) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सोशल मीडियावर अपघाताची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये अनेक कार आणि ट्रक एकमेकांवर आदळताना आणि एकमेकांच्यावर चढताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अपघातात जखमी झालेले अनेक लोक वाहनांमध्येच अडकून पडले होते.

त्यांना बाहेर काढण्याठी बचाव पथकाला अथक प्रयत्न करावे लागले. चिनी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी २०० हून अधिक वाहने पडून होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. चिनी माध्यमांनुसार, या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे ११ बंब आणि तब्बल ६६ कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य करण्यात आलं.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT