भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी विधान परिषदेचे आमदार महेंद्र यादव (७५) यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महेंद्र यादव यांची जमिनीशी घट्ट नाळ असलेले नेते अशी ओळख होती. ते उत्तरप्रदेश येथील मुंडेरा गावचे होते. महेंद्र यादव हे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेवर तीन वेळा निवडून गेले होते.
महेंद्र यादव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मागच्या चार दिवसांपासून त्यांना गोरखपूर येथील राजेंद्र रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले होते. सोमवारी पहाटे २:०० वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच, परिसरात आणि पक्षात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने गर्दी जमली होती.
१९५१ मध्ये वडील राम अवध यादव यांच्या पोटी जन्मलेल्या महेंद्र यादव यांची राजकीय कारकीर्द मोठी होती. महेंद्र यादव यांना एक छोटा भाऊ होता, त्यांचे धाकटे भाऊ राजेंद्र यादव होते. त्यांनी १९८२ ते १९९७ पर्यंत सदर ब्लॉक प्रमुख, १९९७ ते २००५ पर्यंत विधान परिषद सदस्य (एमएलसी) आणि २०११ ते २०१७ पर्यंत भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले.
त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुल आहे. त्यापैकी एक गोरखपूरमधील नामांकित डॉक्टर आहेत. अभिषेक यादव त्यांचे नाव असून त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये महेंद्र यादव यांच्यावर उपचार सुरू होते. महेंद्र यादव यांना दोन मुली देखील आहेत. बिंदु आणि पुनम असे त्यांचे नाव आहे. महेंद्र यादव गेल्या काही वर्षांपासून आजारी होते. अधूनमधून जेव्हा त्यांची प्रकृती सुधारत असे तेव्हा ते त्यांच्या निवासस्थानी लोकांना भेटत आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असत. अलीकडे, चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती आणि सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याने राजकीय वर्तुळासह भाजपमध्ये शोककळा पसरली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.