राष्ट्रीय गुणवत्तेत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अव्वल Saam TV
देश विदेश

राष्ट्रीय गुणवत्तेत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी अव्वल

सहकारी साखर कारखानादारीच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील यंदाच्या वर्षांसाठीची (२०२१) गुणवत्ता पारितोषिके जाहीर करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: सहकारी साखर कारखानादारीच्या क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील यंदाच्या वर्षांसाठीची (२०२१) गुणवत्ता पारितोषिके जाहीर करण्यात आली. त्यामध्ये २१ पारितोषिक पटकावून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळवलं आहे. देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून मानाचे पारितोषिक मानला जाणारा वसंतदादा पाटील पुरस्कार सोलापूरच्या श्री पांडुरंग कारखान्याला मिळाला आहे.

यंदा देशातील २८४ पैकी १०८ सहकारी साखर कारखान्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी आज या पारितोषकांची घोषणा केली. देशातील १०८ सहकारी कारखान्यांचे यानिमित्ताने विविध निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.

महाराष्ट्रातील ४६ कारखाने यात सहभागी होते. मूल्यमापनासाठी सरासरी दहा टक्के व त्याहून अधिक साखरेचा उतारा असलेले आणि दहा टक्क्यांपेक्षा कमी उतारा असलेले कारखाने दोन गटात वर्गवारी करून मूल्मापन करण्यात आले होते. तसेच यंदा एका कारखान्याला एकच पारितोषिक असा मापदंड लावून हे मूल्यमापन सर्वसमावेशक करण्यात आले.

कोरोना साथीमुळे गेल्यावर्षी पारितोषिक वितरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षीची व वर्मतान वर्षाची पारितोषके वितरणाचा कार्यक्रम एकत्रितपणे 16 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार खात्याचे मंत्री अमित शहा, ज्येष्ठ नेते शरद पवार, रस्ते व परिवहन मंत्री नितिन गडकरी, वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

पारितोषकांचे मानकरी

१) देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील पुरस्कार श्रीपांडुरंग कारखाना, सोलापूर.

२) ऊस विकास व उत्पादकता प्रथम पारितोषिक श्रीदत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळ, कोल्हापूर द्वितीय पुरस्कार राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना सांगली.

३) तांत्रिक कार्यक्षमता विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे. द्वितीय पुरस्कार डॉ. पतंगराव कदम सोनहिरा कारखाना, सांगली.

४) विक्रमी ऊस गाळप जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर.

५) विक्रमी ऊस उतारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, सातारा.

६) अत्युत्कृष्ट सहकारी साखर कारखाना श्री छत्रपति शाहू सहकारी साखर कारखाना, कागल, कोल्हापूर.

७) विक्रमी साखर निर्यात प्रथम विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, पिंपळनेर. द्वितीय सह्याद्रि पांडुरंग कारखाना, सोलापूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

Sunita Ahuja: ४० वर्ष सोबत राहणं सोपी गोष्ट...; गोविंदासोबत घटस्फोटाच्या अफावांवर पत्नी सुनीता आहुजा स्पष्टचं बोलली

Maharashtra Live News Update: शरीर संबंध ठेवण्यास नकार दिल्याने नवऱ्याने केली होणाऱ्या बायकोची हत्या

SCROLL FOR NEXT