Maharashtra Weather Saam Tv
देश विदेश

Maharashtra Weather: उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता, महाराष्ट्राची काय स्थिती?

Weather Forecast: उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे.

Rohini Gudaghe

Maharashtra Weather Wpdate

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात (weather news) मोठा बदल झाला आहे. सध्या राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट काहीसं दूर झालं आहे. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणाऱ्या आर्द्रतेमुळे काही ठिकाणी ढगाळ हवामान राहणार आहे. (latest weather update)

राज्यात कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका बसत (Maharashtra Weather) आहे. उन्हाची ताप आणि उकाड्यात वाढत होत आहे. किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. आज राज्यात उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यात पावसाची शक्यता

येत्या 24 तासांत महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने चांगलंच थैमान मांडलं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. आजही राज्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (Maharashtra Weather Wpdate) आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी तापमानात वाढ झाली होती. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस आणि थंड वाऱ्यामुळे पुन्हा तापमानात अचानक घट झाली आहे. डोंगराळ भागात सुरु असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडी वाढली (Weather Forecast) आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळं हवामानात मोठा बदल झाला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये गारपीटीची शक्यता

11 मार्चपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस ( Summer) किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची आणि गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या या पश्चिमी वाऱ्यांचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं जात ( Summer) आहे. त्यामुळं पुढील काही दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governement Decision: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ; सरकारचा मोठा निर्णय

Crime : रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दारू प्यायले अन्...

Viral Video: दुचाकी पार्किंगवरून पेटला वाद, तरूण आणि पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Rain Live News : पुण्यातील मुळशीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस

Wardha : मुखाग्नी देताच स्मशानभूमीत घडले भयंकर; नातेवाईकांची उडाली धावपळ

SCROLL FOR NEXT