Chhagan Bhujbal  Saam TV
देश विदेश

Maharashtra Politics: छगन भुजबळांविरोधात मविआचा उमेदवार ठरला, कोणाला मिळाली संधी?

Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसचे विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड छगन भूजबळ यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.

Priya More

प्रमोद जगताप, दिल्ली

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला उमेदवारी द्यायाची यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. काही उमेदवारांची नावं निश्चित झाली आहेत. तर काहीच्या नावाची घोषणा पक्षांकडून करण्यात आली आहे. अशामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. काँग्रेसचे विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड छगन भूजबळ यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे येवला विधानसभा मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.

काँग्रेसचे नेते दत्ता आव्हाड यांनी येवला विधानसभा मतदारसंघासंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे आणि मधुसुदन मिस्री यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी २० वर्षे राहिलेल्या सन्मानीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आली आहे असं म्हणत छगन भूजबळ यांच्यावर जोरदार टीका केली.

दत्ता आव्हाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नाशिक-येवला विधानसभा मतदारसंघाची त्यांना माहिती दिली. छगन भुजबळ जातीयवादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. एवढ्या वर्षात येवला मतदारसंघाचा विकास झाला नाही

येवल्यात प्रक्रिया उद्योग आणला असता तर फायदा झाला असता. मी पवारसाहेबांची, जयंत पाटील यांची भेट घेतली होती. सगळ्यांनी मविआ म्हणून आपण लढलं पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. केवळ सरकारी इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

SCROLL FOR NEXT