Petrol Diesel Price Today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : पेट्रोल डिझेलच्या दरात मोठा बदल; झटपट चेक करा इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Latest Price : देशातील तेल कंपन्यांनी दररोज सकाळप्रमाणे आज देखील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहे. अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होताना दिसत आहेत.मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

बिहारमध्ये (Bihar) आज पेट्रोल 28 पैशांनी महागले असून ते 109.15 रुपयांनी विकले जात आहे. तर डिझेल 26 पैशांनी महागले असून त्याची किंमत 95.80 रुपये प्रति लीटर इतकी आहे. हरियाणात पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी वाढले आहे. हिमाचलमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 49 पैशांनी वाढ झाली आहे.

तसेच झारखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि त्रिपुरामध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) महागले आहे. दुसरीकडे, तेलंगणामध्ये पेट्रोल 1.48 रुपयांनी घसरून 110.35 रुपये आणि डिझेल 1.39 रुपयांनी घसरून 98.45 रुपये प्रति लिटरवर पोहोचले. राजस्थानमध्ये पेट्रोल 59 पैशांनी तर उत्तर प्रदेशात 47 पैशांनी स्वस्त झाले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

SCROLL FOR NEXT