Supreme Court Twitter/ @ANI
देश विदेश

Maharashtra local body election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली, कारण काय?

महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर

Shivaji Kale

Mumbai News :ओबीसी राजकीय आरक्षण प्रकरण पुन्हा लांबणीवर गेले आहे. आज (मंगळवारी) होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षण तसेच महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका या संदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ही सुनावणी २८ मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्र सरकारचे वकील तुषार मेहता हे आजच्या सुनावणीवेळी गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलली गेल्याच म्हटलं जात आहे.

९२ नगरपालिकांमधील ओबीसी आरक्षण तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका (Election) या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. गेल्या तारखेच्या वेळी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरू होती.

गेल्या अनेक महिन्यांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. २१ मार्च रोजी न्यायालयात राज्य सरकार काय भूमिका घेणार यावर फैसला होणार होता. मात्र आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत सुनावणी झाली असती तर, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबतचे चित्र देखील लगेच स्पष्ट झाले असते .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivling: शिवलिंगावर पाणी अर्पण का करतात? जाणून घ्या, त्यामागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण

Thane Crime: १५-२० जण एकावरच तुटून पडले, तरूणाची निर्घृण हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेचा सीसीटीव्ही, गरोदर पत्नीचा टाहो

Mahadevi Elephant : आणू महादेवीला घरी...! हत्तीणीला परत आणण्यासाठी दोन लाखांहून अधिक कोल्हापूरकरांनी दिली स्वाक्षरी

Maharashtra Live News Update : - यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

Narali Purnima: नारळी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे? ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT