UPSC  Saam Tv
देश विदेश

सॉरी आई-बाबा, प्रयत्न केले,पण …, UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीनं दिल्लीत आयुष्य संपवलं!

UPSC : दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील अकोल्याच्या (Maharshtra Akola) विद्यार्थीनीने आयुष्य संपवलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

UPSC Aspirant End Life : दिल्लीमध्ये युपीएससीची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील अकोल्याच्या (Maharshtra Akola) विद्यार्थीनीने आयुष्य संपवलं आहे. मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्ली (Delhi) युपीएससी परीक्षाबाबात (UPSC Exam) होणाऱ्या वेगवेगळ्या घटनेमुळे चर्चेत आहे. पूजा खेडकर (Pooja Khedkar) प्रकरण, कोचिंग सेंटरमध्ये साचलेल्या पावसात तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यू यासारख्या कारणामुळे दिल्लीमधील युपीएससी चर्चेत आहे. आता अकोल्यातीन मुलीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंजली असं त्या मुलीचं नाव असून तिने सुसाईड नोटही लिहिली आहे. परीक्षा आणि खर्चाला कंटाळून आयुष्य संपवल्याचं चिठ्ठीतील माहितीवरुन समोर आलेय. अंजलीच्या सुसाईड नोटमध्ये पेइंग गेस्ट सुविधा आणि हॉस्टेलच्या महागड्या खर्चाचाही उल्लेख आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भातील वृत्त दिलेय.

अंजली राजधानी दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये UPSC तयारी करत होती. शनिवारी अंजलीने हॉस्टेलच्या आपल्या खोलीमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. ‘सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा’ आणि ‘रोजगार निर्माण’ करण्याचे आवाहन सुसाईड नोटमध्ये तिने सरकारला केले. वाढलेल्या रुम भाड्यामुळेही तणावात होती असं या चिठ्ठीतून स्पष्ट होत आहे.

अंजलीने सुसाईड नोटमध्ये काय म्हटले ?

आई-बाबा मला माफ करा. मी आता आयुष्याला कंटाळले आहे. माझ्यासमोर फक्त समस्या आणि समस्याच आहेत. मला आता शांततेची गरज आहे. या नैराशातून मुक्त होण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्यावर मात करू शकले नाही, असं अंजलीने तिच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

पहिल्याच प्रयत्नात युपीएससी (UPSC) परीक्षा पास व्हावी असं माझं स्वप्न होतं. पण मी किती चंचल आहे ते सर्वांना माहितेय. कृपया सरकारी परीक्षांमधील घोटाळे कमी करा आणि रोजगार निर्माण करा. नोकरीसाठी अनेक तरुण धडपडत आहेत, असंही तिने म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT