Anaaj Wale Baba In Kumbh mela Money Control
देश विदेश

Mahakumbh 2025: महाकुंभात पोहोचले 'धान्य बाबा', साधू बुवाने डोक्यावरच पिकवली गहू, हरभऱ्याची शेती

Anaaj Wale Baba : महाकुंभमेळ्यात धान्यवाले बाबा अमरजीत यांची वेगळी ओळख बनलीय. पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी ते गेल्या ५ वर्षांपासून डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा, वाटाणा ही पिके घेत आहेत.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये तब्बल १२ वर्षांनंतर महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महान भक्ती सोहळ्याला कोट्यवधी लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या या मेळ्यात विविध आखाड्यांमधील संत प्रयागराजमध्ये पोहोचत आहेत. त्याचबरोबर या महाकुंभ २०२५ मध्ये अनेक संत-महात्मांची विविध रूपे पाहायला मिळतायत. कुंभमेळ्यात अनेक अद्भूत संत पाहायला मिळत आहेत.

हे साधू आपल्या खास ओळखीमुळे आकर्षणाचे केंद्र बनलेत. यापैकी एक सांधू म्हणजे 'अण्णाज वाले बाबा (धान्य वाले बाबा)'. या कुंभमेळ्यात एका अनोखा साधूची चर्चे सर्वत्र होतेय. यांचे नाव 'अनाज वाले बाबा' आहे. यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा आणि वाटाणा पिकवला आहे. हे साधू बाबा हठ योगाचा सराव करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी ते त्यांच्या डोक्यावरच पिके उगवतात.

धान्य बाबाचे खरे नाव अमरजीत असून त्यांनी आपल्या डोक्याला शेत बनवलंय. गेल्या पाच वर्षांपासून ते डोक्यावर गहू, बाजरी, हरभरा, वाटाणाचे पीक घेतले आहे. या साधू बाबाच्या डोक्यावर पिकं पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसलाय. या कुंभमेळ्यात सर्वाधिक चर्चा या सांधूची होतेय. अनाज वाले बाबा म्हणजेच धान्यावाले बाबा हे हठयोगाचे समर्पित अभ्यासक आहेत. पर्यावरणाविषयी सखोल संदेश देण्यासाठी त्यांच्या अपारंपरिक पद्धतीचा वापर करतात.

डोक्यावर का पीक घेतात

आपल्या डोक्यावर पिकं घेण्याबाबत त्यांनी सांगितलं की, जंगलतोड वाढत आहे आणि लोकांना अधिक झाडे लावण्यासाठी त्यांना प्रेरित करायचे आहे. त्यामुळे ते डोक्यावर पीक घेतात. बाबा दररोज त्यांच्या पिकांना पाणी देतात जेणेकरून त्यांची वाढ चांगली होईल. कुंभमेळ्यात ते आल्याने सर्वजण त्यांचीच चर्चा करत आहेत. धान्यवाले बाबा पर्यावरण संरक्षणाचे प्रतीक बनले आहेत. आपल्या मिशनबद्दल बोलताना ते म्हणाले, “जंगलतोड ही वाढती समस्या आहे, आणि मी लोकांना अधिक झाडं लावण्यासाठी प्रेरित करू इच्छितो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT