Mahadev Jankar News Saam tv
देश विदेश

Mahadev Jankar News: महाविकास आघाडीमध्ये रासपची एन्ट्री होणार का? शरद पवारांचा उल्लेख करत महादेव जानकर म्हणाले?

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Mahadev jankar News:

महायुतीसोबत असलेला राष्ट्रीय समाज पक्ष हा महाविकास आघाडीसोबत येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यासाठी महादेव जानकर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, महादेव जानकरांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. 'माझी आणि शरद पवारांची कुठलीही भेट झाली नाही, असं स्पष्टीकरण राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट झाल्याचं वृत्त हाती आलं होतं. जानकरांनी दिल्लीत काही दिवसांपूर्वी ही भेट घेतल्याची माहिती आहे. महादेव जानकर आणि शरद पवार यांच्या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कथित भेटीवर प्रतिक्रिया देताना महादेव जानकर म्हणाले, 'माझी आणि शरद पवारांची आज भेट झाली नाही. गेल्या महिन्यात विमानतळावर भेट झाली होती. मात्र, तिथं कुठलीही राजकीय चर्चा झाली नव्हती. त्यावेळी इतरही काही व्हिआयपी लोक उपस्थित होते. माझा पक्ष देशभर जनस्वराज्य यात्रा काढत आहे. तशी आमची चर्चा सुरू आहे'.

'मी सध्या कुठल्याही आघाडीचा भाग नाही. मला इंडियाकडून कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नाही. आमचा पक्ष राजस्थान, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात निवडणुका लढणार आहे. मी बारामतीसह इतर ४ मतदार संघाचं लोकसभेचं तिकीट पार्लमेंट्री बोर्डाकडे मागितलं आहे, असे जानकर पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT