Maha Kumbh 2025 yandex
देश विदेश

Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळाव्यासाठी ई-पास कसा मिळवाल? जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Maha Kumbh melava : महा कुंभ मेळाव्याच्या पाससाठी काही श्रेणींसाठी पास जारी करण्यात येणार आहेत. तुम्हाला पास हवा असेल तर तुम्हाला कॅटेगरीनुसार पास घ्यावे लागतील. प्रत्येक श्रेणीसाठी वेगळा पास असणार आहे.

Vishal Gangurde

Maha Kumbh 2025 : कुंभ मेळाव्याला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची माहिती हाती आली आहे. या कुंभ मेळाव्याला जाण्यासाठी सहा रंगाचे ई-पास जारी करण्यात आले आहे. पोलिसांपासून आखाड्यातील व्हीआयपी लोकांसाठी वेगवेगळ्या रंगाचे ई-पास जारी करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येकाच्या श्रेणीनुसार राखीव जागा निश्चित करण्यात येणार आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारची सुविधा मिळावी, यासाठी सर्व विभागीय पातळीवर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

उच्च न्यायालय, व्हीआयपी, विदेश राजपूत, विदेशी नागरिक आणि टुरिस्ट यांच्यासाठी केंद्र, राज्य विभागाने पांढऱ्या रंगाचा ई-पास जारी केला आहे. आखाडा आणि संस्थेच्या लोकांसाठी भगव्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे. कार्यदायी संस्था, वेंडर, फूड कोर्ट आणि मिल्क बूथ यासाठी पिवळ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे. माध्यम प्रतिनिधी, पोलीस दलाला निळ्या रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे. आपात्कालीन आणि आवश्यक सेवांसाठी लाल रंगाचा ई-पास जारी करण्यात आला आहे.

महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सर्व भाविकांना सुरक्षेच्या बाबतीत सर्व प्रकारच्या सुविधांची सोय करण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहे की, जगभरातून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पार्किंगपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व विभागांना ई-पास जारी करण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनांसाठी ई-पास गरजेचा असणार आहे.

वाहन ई-पाससाठी उत्तर प्रदेशची नोडल आयटी संस्था यूपीडेस्को माध्यमांकडून ई-पास व्यवस्था लागू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व विभागातील लोकांना वाहन पास देण्यात येईल. वाहन पासचे देखील कामानुसार वर्गीकरण येण्यात येणार आहे. या वाहन पाससाठी अर्ज करण्यासाठी वैयक्तिक माहिती, रंगीत फोटो, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, वाहन नोंदणी प्रमाणपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसेन्सची प्रत गरजेची आहे. या प्रतींवर अर्जदाराला सही करावी लागणार आहे. पोलिसांसाठी देखील विशेष वाहन पासची सुविधा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भरपावसात आदिवासी महिलांचा अवैध दारू विरुद्ध एल्गार

Silent Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक कसा ओळखायचा, लक्षणे कोणती?

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी आक्रमक; शरद पवारांच्या नेतृत्वात नाशकात मोर्चा निघणार, VIDEO

Lalbaugcha Raja : ३३ तासांनी लालबागच्या राजाचं अखेर विसर्जन, पाहा शेवटची झलक; VIDEO

SCROLL FOR NEXT