Earthquake
Earthquake  saam TV
देश विदेश

China Earthquake : भूकंपाच्या तीव्र झटक्याने चीन हादरला; रिश्टर स्केलवर 7.3 तीव्रतेची नोंद

वृत्तसंस्था

China Earthquake News : सीरिया आणि तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असताना आज सकाळी चीन आणि ताजिकिस्तानच्या सीमेवर 7.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या तीव्र झटक्याने चीन हादरला आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 एवढी नोंदवली गेली आहे. चीनमध्ये आलेल्या या भूकंपाची तीव्रता तुक्रस्तानमध्ये आलेल्या भूकंपाच्यातुलनेत अधिक होती.

तुर्कस्तानात आलेल्या भूकंपाची (Earthquake) तीव्रता 6.9 एवढी होती. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपात 40 हजार पेक्षा जास्त लोंकाना आपला जीव गमवावा लागला.मात्र, या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही. सुदैवाने या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कोणता भूकंप धोकादायक ?

भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.

USGS काय म्हणते?

USGS च्या अंदाजानुसार, ताजिकिस्तानमध्ये ज्या भागात भूकंप झाला तो भाग पर्वताच्या शिखरांनी वेढलेला आहे. अशा परिस्थितीत तेथे भूस्खलनही होऊ शकते, तसेच या भागात लोकसंख्या खूपच कमी आहे. मात्र, चीनमधील परिस्थितीबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

तुर्कीए आणि सीरियामध्ये मोठा भूकंप

तुर्कस्तान आणि सीरिया या दोन देशांना सोमवारी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी भुकंपाचे तीव्र झटके बसले.  याची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली होती. भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली.

लाखो नागरिक बेघर झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कंपाचे धक्के इतके जोरदार होते की, दोन्ही देशातील शेकडो इमारती कोसळल्या होत्या. तर हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT