Madhya Pradesh Viral Story  Saam Tv
देश विदेश

Shocking : ...अन् १ वर्षांच्या मुलाच्या घशात अडकला जिवंत मासा; पालकांची एकच धावाधाव, नेमकं काय घडलं?

Madhya Pradesh Viral Story : इंदूरमध्ये एक वर्षाच्या बाळाच्या तोंडात जिवंत मासा अडकल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांनी एंडोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढत बाळाचे प्राण वाचवले.

Alisha Khedekar

  • इंदूरमध्ये बाळाच्या तोंडात जिवंत मासा अडकला

  • डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून जीव वाचवला

  • बाळाची प्रकृती गंभीर होती

  • पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन

मध्य प्रदेशातील इंदूर येथे एक वर्षाच्या मुलाच्या तोंडामध्ये जिवंत मासा अडकल्याची घटना घडली आहे. या घटनेने डॉक्टर देखील गोंधळात सापडले. दरम्यान त्या मुलावर यशस्वी शत्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या तोंडातून जिवंत मासा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा पालकांचं आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली आहे. एका घरात फिश टँक साफ करण्याचं काम सुरु होतं. याच दरम्यान त्या घरातील एक वर्षाचं बाळ बाजूला खेळत होत. खेळता खेळता त्या बाळाने फिश टँक वरती हात मारून चॉकलेट खावं तसं एक मासा पटकनं तोंडात टाकला. हा जिवंत मासा बाळाच्या घशात अडकल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

इतकेच नाही तर मुलाच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णलयात हलवले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरु केले. अथक प्रयत्न करून डॉक्टरांनी सुमारे ३ इंच लांबीचा मासा यशस्वीपणे बाहेर काढला. माशाच्या कल्ल्यांच्या आणि पंखांच्या हालचालीमुळे मुलाच्या घशाला आणि अन्ननलिकेला इजा झाली असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. अशोक यादव यांनी सांगितले की, एंडोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये अशा घटना खूप धोकादायक ठरू शकतात, कारण त्यांचे श्वसनमार्ग अरुंद असतात आणि त्यात थोडासा अडथळा आला तरी तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे, पालकांनी आपल्या मुलांना लहान किंवा इतर वस्तूंपासून दूर ठेवावे आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India squad announced : टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कुणाला पुन्हा संधी, कुणाचं कमबॅक?

Maharashtra News Live Update: नवी मुंबईत FDA आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Wednesday Horoscope: 7 राशींचं नशीब चमकणार! धनलाभासह मिळणार मोठी खुशखबर

Sleeping Without Underwear: रात्रीच्या वेळेस अंतर्वस्त्र घालून झोपणं योग्य की अयोग्य?

Rajmachi Fort : एकाच पठारावर दोन बालेकिल्ले! राजमाची किल्ल्याचे 'हे' रहस्य तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT