देश विदेश

खाडssss... कानाखाली जोरात लगावली; संतापलेल्या नवऱ्याने बायकोचा जीव घेतला

husband kills wife : बायकोने नवऱ्याच्या कानाखाली लगावली. त्यानंतर नवऱ्याने रागात बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Vishal Gangurde

चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद

पत्नीने रागात नवऱ्याच्या कानाखाली लगावली

नवऱ्याने रागात बायकोलाच संपवलं

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील करैरा भागात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. चारित्र्याच्या संशयावरून जोडप्याचा संसारात मिठाचा खडा पडला. दोघांमधील वाद इतका टोकाला गेला की, नवऱ्याने २३ वर्षीय बायकोची हत्या केली. हत्या करताना घरात दीर आणि वहिनी देखील होते. पत्नीने रागात नवऱ्याच्या कानाखाली लगावली होती. त्यानंतर रागात असलेल्या नवऱ्याने बायकोलाच संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवपुरीच्या टीला रोड येथे राहणाऱ्या संदीप साहू याचं ५ वर्षांपूर्वी नंदनी साहूसोबत लग्न झालं होतं. त्यांना ४ वर्षांच मुलगा देखील आहे. संदीप हा पत्नी नंदनीच्या चारित्र्यावर सारखा संशय घ्यायचा. यावरून दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर नवऱ्याने रागात येऊन बायकोचा मोबाईल फोडला. ही बाब माहेरच्या लोकांना कळाली. त्यानंतर सर्व जण सासरी आले होत. परंतु त्यानंतरही दोघांमधील वाद मिटला नाही.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

दोघांमध्ये १८ एप्रिल रोजी वाद झाला. या वादानंतर नंदनी घर सोडून जाऊ लागली. त्यावेळी पतीने पत्नी नंदनीला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नंदनीने नवऱ्याच्या जोरात कानाखाली लगावली. त्यानंतर पती संदीपने बायकोला बेदम मारहाण केली. त्यानंतर एका खोलीत नेऊन बायको नंदनीचा गळा आवळून जीव घेतला.

पती संदीप साहूने त्याच्या नातेवाईकांना नंदनीची गळा दाबून हत्या केल्याचे सांगितले. नंदनीची हत्या केल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ कल्याण साहू, काका हरि साहू आणि मावस भाऊ महेश साहू त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी नंदनीचा मृतदेह एका पलंगावर पडलेला दिसला.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनीच्या गळा आणि चेहऱ्यावर नखे लागली होती. तिच्या पाठीवर जखमा होत्या. आरोपी पतीने तिच्या हातावर चावल्याचे निशाण होते. या घटनेतून स्पष्ट झालं की, त्यादिवशी दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर संदीप साहूने कुटुंबीयांसमोर तिची हत्या केल्याचे कबूल केले. हत्या करताना त्याचा भाऊ आणि वहिनी देखील घरात होती. पोलिसांनी या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेतलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT