MADHYA PRADESH IAS TRANSFERS saam tv
देश विदेश

महापालिकांचे आयुक्त बदलले! IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

Transfers Four IAS Officers Latest News: मध्य प्रदेश सरकारने चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. संस्कृती जैन यांची वित्त विभागात नियुक्ती, तर रामप्रकाश अहिरवार यांच्याकडे भोपाळ महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Omkar Sonawane

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने रविवारी रात्री प्रशासनात फेरबदल करत 4 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्त संस्कृती जैन यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी जबलपूर महानगरपालिकेचे आयुक्त रामप्रकाश अहिरवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन विभागाने यासंदर्भातील प्रसिद्ध पत्रक जारी केलं आहेत.

संस्कृती जैन यांची मध्य प्रदेश सरकारच्या वित्त विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या याआधी भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदासह मध्य प्रदेश मेट्रो रेल कंपनी लिमिटेडच्या अपर प्रबंध संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होत्या. दरम्यान, 2018 बॅचचे आयएएस अधिकारी रामप्रकाश अहिरवार हे याआधी जबलपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता त्यांच्याकडे भोपाळ महानगरपालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच मध्य प्रदेश मेट्रो रेल कंपनी लिमिटेड, भोपाळच्या अपर प्रबंध संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांना देण्यात आला आहे.

या प्रशासकीय फेरबदलात अंजू अरुण कुमार आणि अग्रिम कुमार यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. अंजू अरुण कुमार यांची पंचायत आणि ग्रामीण विकास विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. त्या याआधी भोपाळ स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होत्या.

तर, छिंदवाडा जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले 2020 बॅचचे आयएएस अधिकारी अग्रिम कुमार यांची जबलपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे भोपाळ आणि जबलपूर महानगरपालिकांच्या आयुक्तपदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली असून, इतर दोन अधिकाऱ्यांनाही नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात रंगली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

SCROLL FOR NEXT